computer

जगातली १० सर्वात महागडी आईस्क्रीम्स

मिष्टान्न सगळ्यांनाच आवडतात मग त्यात आईसक्रीम तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रसिद्ध आहेत. या आठवड्यात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला असला तरी नुसत्या आईस्क्रीमच्या नावाने मनाला जो थंडावा जाणवेल त्याला तोड नाही. लहानपणच्या रस्त्यावरच्या कुल्फीपासून पंचतारांकित आईस्क्रीमपर्यंत , प्र्त्येकाचं आपल्या आयुष्यात वेगळंच स्थान आहे. 

 तुम्हाला कदाचित माहित नसेल की जगात अशीही काही आईस्क्रीम्स आहेत जी सर्वात महागडी मानली जातात. त्यातीलच निवडक १० ची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. अर्थातच ही परदेशातली उत्पादनं असल्यानं किंमती डॉलर्समध्ये आहेत. पण रूपयांतच इतक्या किमती असतील तर आणखी ६५रूपयांनी गुणल्यावर किती? आहे की नाही डोक्याला थोडंसं खाद्य? पाहूयात मग देशोदेशीची सर्वात महाग आईस्क्रीम्स..

१०. ब्लॅक डायमंड $817

दुबईच्या स्कुपी कॅफेमध्ये ब्लॅक डायमंड आईस्क्रीम मिळते. कॅफे मालकाने दिलेल्या माहितीनुसार हे आईसक्रीम बनवण्यासाठी लागणाऱ्या योग्य सामग्रीचे मिश्रण मिळवण्यासाठी ५ आठवड्यांचा कालावधी लागतो. आईस्क्रीम बनवण्यासाठी काही दुर्मिळ साहित्याचा वापर केला जातो. मिष्टान्नाचा मुख्य भाग म्हणून मादागास्कर बीन्सचा वापर तर सजावटीसाठी २३ कॅरट सोन्याचा वापर केला जातो. या आईस्क्रीमचा एक स्कूप ८१७ डॉलर्सना मिळतो. 

९. गोल्डन ओपुलांस संडे $1,000

तहिशिअन वॅनीला बीन्स आईसक्रीम आणि जगातील सगळ्यात महाग चॉकलेट हे दोन महत्वाचे घटक गोल्डन ओपुलांस संडेला महाग बनवतात. ह्या व्यतिरिक्त गोल्डन ओपुलांस संडेमध्ये २४ कॅरट एडीबल गोल्ड (असे सोने जे आपण खाऊ शकतो, मिष्टान्नात याचा वापर करतात) पिस्ते, बदाम, फळे घालून तयार केले जाते. याचा एक स्कूप १०००डॉलर्सना मिळतो. म्हणजे एका डॉलरची किंमत सर्वसाधारणपणे ६५रूपये धरली तरी या आईस्क्रीमचा एक स्कूप पडेल ६५,०००रूपयांना! अबब!!

८. द विक्टोरिया संडे आईसक्रीम $1000

द विक्टोरिया संडे आईसक्रीम हे युनायडेट किंगडममधल्या लॅंघम हॉटेलमध्ये मिळणारे आईसक्रीम आहे ज्याची किंमत १००० डॉलर आहे. द विक्टोरिया बनवण्यासाठी त्यात २४ कॅरोट एडीबल गोल्ड, शेंगदाणे, क्रीम, कॅरॅमल, सर्वोत्तम चॉकलेट्सचा वापर केला जातो. आईस्क्रीम सर्व्ह करण्यासाठी एका क्रिस्टलच्या भांड्याचा वापर केला जातो त्याच बरोबर शॅंम्पेन देखील दिली जाते.

७. गोल्डन फिनिक्स कपकेक $1,000

युगांडाचे वॅनीला बीन्स आणि खाण्यात एडीबल गोल्ड यांचा समावेश गोल्डन फिनिक्स कपकेक मध्ये होतो. दुबईच्या ब्लुम्सबेरी कपकेक्समध्ये याची विक्री केली जाते.

६. मोबोसीन मेगा संडे $1000

पिस्ते, बदाम, फळे, कॅरॅमल, क्रीम,चॉकलेट, फ्रेंच बदाम,एडीबल गोल्ड यांचा सर्वाधिक वापर असणारे हे आईस्क्रीम १००० डॉलरला उपलब्ध आहे. एडीबल गोल्ड २४ कॅरॅट वापरण्यात येते त्याच बरोबर शॅंपेनचा वापर लज्जत वाढवण्यासाठी केला जातो. तुमचे आईसक्रीम संपल्यानंतर तुम्हाला ५९० डॉलर किमतीची मोबोसीनची रिंग दिली जाते जी पांढरे सोने, काळे स्टील आणि हिर्‍यापासून तयार केलेली असते. मोबोसीन ही एक फ्रेंच कंपनी आहे जी १८२७ पासून दागिन्यांचा व्यापार करत आहे..

५. क्रीस्पी क्रेम्स लक्स डोनट $1682

२४- कॅरॅट गोल्ड, एडीबल डायमंड, कॉकटेल, पांढरे चॉकलेट अशा घटकांचे  मिश्रण असलेले हे आईस्क्रीम इंग्लंडमध्ये मिळते. याची किंमत १६८२ डॉलर आहे. या पदार्थाच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी काही पैसा हा दान केला जातो.

४. फ्रोझन चॉकलेट हट

या आईसक्रीममध्ये खाण्यायोग्य सोन्याचा जास्तीत जास्त वापर केलेला असतोन्यूयॉर्क मध्ये मिळणारी फ्रोझन चॉकलेट हट हे २४ वेगवेगळ्या कोकोस पासून बनवण्यात येते ज्या मधील १४ कोकोस जगातील सगळ्यात मौल्यवान कोको मानले जातात. त्याच बरोबर २३ कॅरोट एडीबल गोल्डने त्याला सजवलेले असते.

.

३. थ्री ट्विन्स आईसस्क्रीम संडे $3,333.33

हे आईसक्रीममधले तीन जुळे ३,३३३.३३ डॉलर्सना मिळतात. केळेमिश्रित आईसक्रीमवर ओतलेला दुर्मिळ डीझर्ट वाईन्सचा घट्ट द्राव असं काहीसं याचं वर्णन करता येईल. याच्या किमतीचा तिसरा हिस्सा एका लॅंड ट्र्स्टला दिला जातो.

2. द अब्सरडीटी संडे $60,000

आफ्रिकेतील किलीमांजारो पर्वतावर काही साजेसं खाण्याचा आनंद घेण्यासाठी जर तुम्ही ६०,००० डॉलर खर्च करायला तयार असाल तर आईसक्रीम संडे हे तुमच्यासाठीच आहे. आफ्रिकेच्या सर्वात उंच शिखरावर आईसक्रीम संडे तुमचा आनंद द्विगुणीत करेल. ह्या ६०,००० डॉलर किमतीत तुम्हाला टांझानियाला जाण्याचं प्रथम श्रेणी तिकीट, एका पंचतारांकित हॉटेल मध्ये राहणे, एका मार्गदर्शकाबरोबर क्लायबिंग आणि आठवण म्हणून एक टी-शर्ट चा समावेश आहे. हे आईसक्रीमदेखील थ्री ट्वीन आईसक्रीम य कंपनीनेच बनवले आहे.

१. स्ट्रोबेरी अरनॉड $1.4 million

उत्कृष्ट भांड्यात स्ट्रोबेरी मॅरीनेट करून ती क्रीम आणि पुदिन्याबरोबर मांडण्यात येते. अर्नोड मध्ये उपलब्ध असलेली हे मिष्टान्न न्यू ऑरलियन्सने विकसित केलेले आहे. ह्याची किंमत १.४ मिलियन डॉलर आहे ज्याला ४.७ कॅरेट गुलाबी हिऱ्यांनी सजवले आहे.