computer

आभार मानायची अतरंगी पद्धत....आजोबांनी लिहून काढली ७०,००० सबस्क्रायबर्सची नावं !!

तरुणांनी भरलेल्या युट्युबवर काही वृद्ध मंडळी आपला दबदबा तयार करत आहेत. आपल्या दिवंगत मस्तानम्मा यांचं उदाहरण घ्या ना. त्या अगदी शेवट पर्यंत जोशात काम करत होत्या. असेच एक वयाने वृद्ध असलेले आजोबा सध्या व्हायरल होत आहेत. चला आज या आजोबांविषयी जाणून घेऊया.

 

 

 

या आजोबांचं नाव आहे ‘नेल्सन आयझायस’. ते युट्युबवर आपल्या बागेतील फुलं आणि फळं यांच्याविषयी माहिती सांगत असतात. त्यांनी आपल्या मोजक्या व्हिडीओ क्लिप्स मधून ७०,००० सबस्क्रायबर कमावले आहेत.

७०,००० चा आकडा पार झाल्यावर त्यांनी आपल्या सबस्क्रायबर्सचे आभार मानायचं ठरवलं. यासाठी त्यांनी एक अतरंगी कल्पना शोधून काढली. त्यांनी डिसेंबर २०१८ पासून आपल्या सर्व ७०,००० सबस्क्रायबर्सची नावं लिहून काढायला सुरुवात केली. त्यांनी चक्क सगळीच्या सगळी नावं लिहून काढली आहेत.

त्यांना ही कल्पना का सुचली असं विचारल्यावर ते म्हणाले की मला स्वतःहून प्रत्येकाचे आभार मानायचे होते.

मंडळी, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या ३६ लाखांच्या घरात गेली आहे. वाढत्या सबस्क्रायबर्सची संख्या बघूनही या आजोबांनी आपली जुनी पद्धत बंद केली नाही. ते आताही नवीन सबस्क्रायबरला आवर्जून स्वतः thank you म्हणतात.

तर मंडळी, कशी वाटली आजोबांची अतरंगी आयडिया ??

सबस्क्राईब करा

* indicates required