सचिन अ बिलियन ड्रीम्स: आपल्या तेंडल्याचा चित्रपट
Subscribe to Bobhata
हे वर्ष क्रिकेटपटूंवर निघणाऱ्या चित्रपटांचे आहे. अझर, धोनी पाठोपाठ आपल्या लाडक्या सचिनच्या चित्रपटाचे टिझर आज दुपारी सचिनने फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केले. गेल्या काही दिवसांपासून ह्या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती.
याआधी सचिनने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते.
Go chase your dreams because dreams do come true! Stay tuned for the #SRTteaserToday at 1 PM @SachinTheFilm pic.twitter.com/AxkmNKSN3G
— sachin tendulkar (@sachin_rt) April 14, 2016
या टिझरमध्ये सचिन आपल्या आवाजात “तू क्रिकेट खेळायचे ठरवले हा तुझ्या आयुष्याचा एक भाग झाला, पण तू माणूस म्हणून आयुष्यात कसा वागतोस हे चिरकाल राहील” हि त्याच्या वडिलांची शिकवण आपल्याला सांगताना दिसतो. एक नाठाळ मुलगा ते एक चांगला हिरो ज्याने आपल्या देशास एकत्र आणले हा या चित्रपटाचं थोडक्यात सार आहे.
सचिनच्या फॅन्स साठी ही एक प्रकारची पर्वणीच आहे.




