नवाझुद्दिन सिद्दिकीच्या दुर्लक्षित भूमिका: त्याला या चित्रपटांत पाहिल्याचं आठवतंय??

नवाझुद्दिन सिद्दिकीनं १५ वर्षांहून अधिक काळ या मायानगरीत स्ट्रगल करत काढली. आता तो एक नावाजलेला अभिनेता मानला जातो. इतकी वर्षं त्याने केलेले लहानसहान रोल्स लोक शोधून शोधून पाहात आहेत. चला... असे सीन्स शोधायला आज आम्ही तुम्हाला मदत करतो..
१. शूल
शूल सिनेमा आला होता १९९९साली. मनोज वाजपेयी आणि रविना टंडन या दोघांनी या पिक्चरमध्ये मुख्य भूमिका केल्या होत्या. हा सिनेमा होता राम गोपाल वर्माचा. बरीच वर्षं सिनेसृष्टीत धडपडलेल्या मनोज वाजपेयीला हा चांगला रोल मिळाला होता. या सिनेमात नवाझुद्दिनने एका वेटरची भूमिका केली होती.
२. सरफरोश
या सिनेमात आमीर खाननं डॅशिंग एसीपी अजय ठाकूरची भूमिका केली होती. पोलिसी चौकशीदरम्यान नवाझुद्दिनला घाबरावायला आमीर त्याला गोळी घालतो. मेंदूत न जाता बंदुकीची गोळी डोक्यावरचे काही केस फक्त घेऊन जाते आणि नवाझुद्दिन ’पोपटासारखा’ बोलू लागतो.
३. मुन्नाभाई एम. बी. बी. एस.
या सिनेमात नवाझला दोन भूमिका मिळाल्या होत्या. एक म्हणजे सिनेमाच्या सुरवातीला कुणा बिझनेसमनच्या मागे लागलेल्या एका गुंडाची आणि दुसरी म्हणजे सुनील दत्तचं पाकीट मारणार्या माणसाची. सुनील दत्त मग त्याला मुन्नाभाईच्या दवाखान्यात घेऊन येतात.
४. ब्लॅक फ्रायडे
हा नवाझुद्दिनला मिळालेला पहिला मोठा रोल म्हणता येईल. दाढीची वाढलेली खुंटं, रापलेला चेहरा, बसलेली गालफडं हे सर्व पाहून नवाझुद्दिन भुरटा चोर म्हणून इथं फिट्ट बसतो. दुर्दैवानं सिनेमा अधिकृतरित्या रिलीज झाला नाही आणि त्याचं नांव लोकांना कळून तो लक्षात राहण्यासाठी कहानी सिनेमा यावा लागला.
५. एक चालीस की लास्ट लोकल
बर्याच सिनेमांत नवाझुद्दिनला भुरट्या चोराची नाहीतर गुंडाचीच भूमिका मिळाली आहे.
६. आजा नचले
माधुरी दिक्षितच्या पुनरागमाच्या या सिनेमातदेखील नवाझुद्दिन दोन-चार मिनिटं चमकला होता. माधुरीच्या गुरूजींच्या मृत्यूची बातमी तो माधुरीला देतो.
७. फिराक
गोध्रा हत्याकांडावरचा हा चित्रपट ’परझानिया’ इतका अंगावर येत नाही. उलट बरंच काही सांगू पाहतो. या सिनेमातही नवाझ थोडावेळ दिसला होता.
८. न्यूयॉर्क
९. देव डी
आठवतोय ना, ’इमोसनल अत्याचार’??
१०. पीपली लाईव्ह
या सिनेमात नवाझुद्दिनची भूमिका तशी मोठी होती. त्याला इथं पत्रकाराचा रोल मिळाला होता. आत्महत्या करेन म्हणून घोषणा दिलेल्या शेतकर्याला शोधता शोधता तोच एकेठिकाणी अडकतो आणि त्याचा आगीत ओरपळून मृत्यू होतो. त्या शेतकर्याच्या मागे लागलेल्या सगळ्यांना वाटतं की तोच मेला. ज्याच्या मृत्यूचीही खबर कुणाला लागत नाही असं दुर्लक्षित आयुष्य असलेल्या पत्रकाराची भूमिका नवाझला मिळाली होती.
११. पान सिंग तोमर
१३. मनोरमा सिक्स फीट अंडर
या सिनेमातला नवाझचा रोल महत्वाचा नसला, तरी तो पडद्यावर बराचकाळ होता. एका राजकीय नेत्याची गुंडांची जोडगोळी असते, त्यातला एक म्हणजे नवाझुद्दिन. सिनेमात अभय देओलसोबतचे त्याचे फाईट सीन्सपण आहेत.
१४. मिस लव्हली
८०-९०च्या दशकात हॉरर-पॉर्न सिनेमे बरेच बनायचे. या विषयावरच्या सिनेमात नवाझची महत्वाची भूमिका होती. दोन ऍवॉर्ड्स खिशात घातलेला या सिनेमाच्या अस्तित्वाची दखल कुणी का घेतली नाही?
१५. मुद्दा-द इश्श्यू
हा सिनेमा कोणता असावा हे शोधूनही सापडले नाही.. बहुतेक ’मुद्दा-द इश्श्यू” असेल, पण पाहून खात्री करावी असा काही वाटला नाही.
काही म्हणा, आजच्या घडीला नवाझुद्दिननं त्याचं मोठं स्थान निर्माण केलंय. त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला बोभाटा टीमकडून अनेकोत्तम शुभेच्छा!!