मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला वाटते नागरिकांच्या आरोग्यापेक्षा हळदीकुंकू अधिक महत्वाचे, रोग्यांचा इलाज न करता आयोजित केला नाचाचा कार्यक्रम
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित येणार्या चेंबूरमधील दिवालीबेन मेहता इस्पितळात २ मार्चला हळदीकुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला. यात सहभागी होण्यासाठी म्हणून डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचार्यांसह वीसेक लोक सहभागी झाले होते.
गंमत अशी की हा कार्यक्रम साजरा करता यावा म्हणून त्यांनी चक्क बाह्यरूग्ण विभागच(OPD) बंद ठेवला होता. टाईम्सच्या वृत्तानुसार या रूग्णालयातील पहिल्या मजल्यावरचा बाह्यरूग्ण विभाग हा कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर इलाज करतो तर खालच्या मजल्यावरचा विभाग सर्दी-पडसे-तापांसारख्या सर्वसाधारण रोगांसाठी आहे. या हळदीकुंकवासाठी त्यांनी पहिला मजला बंद ठेवून लोकांच्या आरोग्याशी एकप्रकारचा खेळच केला आहे. इस्पितळासारख्या ठिकाणी शांतता राखणॆ गरजेचे असताना तिथे मोठमोठ्याने गाणी लावून नाच करणे हे ही रूग्णांच्या दृष्टीने हितावह नाहीच. रोज ८००च्या वर रूग्णांची तपासणी होणार्या या हॉस्पिटलात त्या दिवशी फक्त ३७७ रूग्णांवरती इलाज करण्यात आला.
या प्रकाराविरूद्ध व्हिडिओ रेकॉर्डिंगसह तक्रार केली गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आता या प्रकरणाची चौकशी चालू आहे.




