बापरे, अजगराला पकडण्यासाठी त्याने स्वत:च्याच पायाचा आमिष म्हणून केला वापर

Subscribe to Bobhata

तुम्ही नॅशनल जिओग्राफिक तत्सम चॅनेलवर प्राण्यांच्या शिकारीचे वेगवेगळे प्रकार पाहिले असतील. पण हा प्रकार आजवर पाहिलेल्या सर्व प्रकारांहून भयंकर आहे. 

हे लोक अजगरांची शिकार करतात आणि तेही स्वत:च्याच जीवावर उदार होऊन. पूर्वतयारी म्हणून ते शरीराला कसलंसं द्रव्य लावतात आणि त्यावर गुडघ्यापर्यंत गुंडाळलेल्या कापडाचा जाड थर देतात. अजगराचे चुकून दात लागलेच तर त्याचं विष शरीरात भिनू नये त्याची तजवीज आहे ही. नंतर त्याच्याच बिळात हा पाय ठेवून ते अजगराने पाय गिळण्याची वाट पाहतात. अजगराने पुरेसा पाय गिळला की आमिष म्हणून बसलेला मनुष्य ओरडतो आणि बाकी सगळे त्याच्या साह्याला येतात. आधीच सोबत ठेवलेल्या सुर्‍याने त्याचं तोंड चिरून साथिदाराची सुटका करतात. हा व्हिडिओतला अशा प्रकारे पकडलेला अजगर हा ३० फूट लांबीचा अजस्त्र देह आहे.

हा अजगर अन्नाअभावी खाण्यासाठी पकडला आहे की त्यापासून वस्तू बनवणार्‍या कंपनीला देऊन पैसे कमावण्यासाठी हे मात्र या चित्रफितीतून कळत नाही. कारण काहीही असो, आयुष्य असं कुठेही पणाला लावावं इतकं क्षुद्र का आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required