रे कबीरा : वाचा कबीराचे दोहे मराठी अर्थासहित !

कबीर काळाच्या पुढे असलेला कवी संत होता. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारा आणि हजारो ग्रंथांचे पाण्डीत्य खुजे करणार्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारा पुरोगामी संत म्हणजे कबीर. कबीर एक व्यक्ति नव्हे टार एक लाईफ स्टाइल आहे मित्रांनो.

Image result for sant kabirस्रोत

आज कबीर जयंती निमित्त बोभाटा तुमच्यासाठी घेऊन आलं आहे काही प्रसिद्ध 'कबीर दोहे' तेही मराठी अर्थासहित :

 

१.

बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय,
जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय ।

अर्थ : जेव्हा मी जगात ‘वाईट’ शोधायला निघालो तेव्हा मला तिळमात्र वाईट दिसलं नाही पण जेव्हा मी माझ्या अंतकरणात डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगात माझ्या पेक्षा कोणीच वाईट नाही.

 

२.

पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय,
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय ।

Image result for love in handस्रोत

अर्थ : पोथी पुरण वाचून सगळेच काही विद्वान, ज्ञानी झाले नाहीत पण जर प्रेमाचे फक्त अडीच (ढाई) शब्द समजून घेतले म्हणजे प्रेमाचा खरा अर्थ समजून घेतला तर तुम्ही नक्कीच ज्ञानी व्हाल.

 

३.

साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय,
सार-सार को गहि रहै, थोथा देई उड़ाय ।

अर्थ : जसे धान्यातील खडे, कचरा पाखडण्यासाठी सूप वापरलं जातं तश्याच प्रकारच्या साधू, विद्वानांची गरज आहे जे समाजातील चांगल्या गोष्टीला टिकवून ठेवतील आणि नको असलेल्या गोष्टींना उडवून लावतील.

 

४.

धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय,
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ।

Image result for watering plantस्रोत

अर्थ : माळीने झाडाला कितीही घडाभर पाणी टाकलं तरी ऋतू आल्यावरच त्याला फळे लागतात तसेच धैर्य ठेवून काम केल्यानेच सर्व काही सिद्धीस जाते असे कबीर म्हणतात.

 

५.

जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान,
मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान ।

Image result for intelligenceस्रोत

अर्थ : ज्ञानी माणसाच्या जाती पेक्षा त्याचं ज्ञान महत्वाच आहे. यावेळी उपमा देतांना कबीर म्हणतात की तलवारीची किंमत करा त्याच्या म्यानाची नाही.

 

६.

दोस पराए देखि करि, चला हसन्त हसन्त,
अपने याद न आवई, जिनका आदि न अंत।

अर्थ : माणसाच्या स्वभावाविषयी बोलताना कबीर म्हणतात की माणूस दुसऱ्यांचे दोष बघता बघता स्वतःचे दोष विसरतो ज्याचा कुठे अंतच नाही.

 

७.

रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय ।
हीरा जन्म अमोल सा, कोड़ी बदले जाय ।

Image result for sand and handस्रोत

अर्थ : रात्र झोपण्यात घालवली आणि दिवस खाण्यात, मनुष्य जन्म इतका अनमोल होता जो तू असा वाया घालवलास. आयुष्य सार्थकी न लावणाऱ्या जन्माची किंमत (मोल) शेवटी फक्त एका कवडी इतकी राहिली.

 

८.

अति का भला न बोलना, अति की भली न चूप,
अति का भला न बरसना, अति की भली न धूप।

अर्थ :  जास्त बोलणंही बरोबर नाही आणि जास्त गप्प बसणंही चांगलं नाही जसं खूप पाऊस आणि खूप उन दोन्हीही प्रकृतीसाठी हानिकारक असतात. याचा अर्थ असा की सर्व काही प्रमाणात असायला हवं.

 

९.

निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय,
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय।

अर्थ : कबीर म्हणतात निंदक किंवा आपल्या बद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तीला आपल्या जेवढं जवळ ठेवता येईल तेवढं ठेवायला हवं कारण असा माणूस आपले दोष दाखवून, बिना साबण पाण्याचचं आपल्याला स्वछ करत असतो.


१०.

जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नाही |
सब अँधियारा मिट गया, दीपक देखा माही |

अर्थ : जेव्हा मला अहंकाराने घेरलं होतं तेव्हा देव दिसला नाही पण गुरूच्या उपदेशाने, त्याच्या मार्गदर्शनातून मला ज्ञानाचा प्रकाश दिसला आणि माझ्या अज्ञान रुपी अंधकार दूर झाला.

 

११.

दुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार,
तरुवर ज्यों पत्ता झड़े, बहुरि न लागे डार ।

Image result for human lifeस्रोत

अर्थ : मनुष्य जन्म फार दुर्लभ असल्याचं कबीर या दोह्यात म्हणतात. मानव शरीर वारंवार मिळत नाही जसं झाडावरून गळालेलं पान पुन्हा झाडाला जोडता येत नाही.

 

१२.

कबीरा खड़ा बाज़ार में, मांगे सबकी खैर,
ना काहू से दोस्ती,न काहू से बैर.

अर्थ : कबीर म्हणतात की जगात सर्वांच भलं (खैर) होवो. कोणाशी दोस्ती झाली नाही तरी चालेल पण दुष्मनी होऊ नये.

 

१३.

हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना,
आपस में दोउ लड़ी-लड़ी  मुए, मरम न कोउ जाना ।

Image result for hindu and muslim riotsस्रोत

अर्थ : हिंदू म्हणतात कि राम आमचा आहे आणि मुस्लीम (तुर्क) म्हणतात की रहमान त्यांचा प्यारा आहे. याच गोष्टीवरून दोघेही आयुष्यभर भांडतात आणि शेवटी दोघांनाही सत्य काय ते समजत नाही.

 

सबस्क्राईब करा

* indicates required