ही भारतीय मुलगी आहे आइनस्टाइनपेक्षा हुशार...IQ टेस्ट मध्ये गाठला उच्चांक !!!

राव माणसानं हुशार असावं.  पण किती ? अल्बर्ट आइनस्टाइन एवढं? स्टीफन हॉकिंग एवढं? या मुलीने तर त्याहीपेक्षा पुढे मजल मारत IQ चा उच्चांक गाठलाय. मंडळी या मुलीचं नाव आहे ‘राजगौरी पवार’.  तिचं वय फक्त १२ वर्ष आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे ही मुळची भारतीय वंशाची आणि त्यातही आपल्या पुण्याची आहे बरं का!!

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या राजगौरी पवारने मेन्सा आयक्यू (बुद्धिमत्ता चाचणी) स्पर्धेत १६२ एवढा मोठा उच्चांक गाठलाय. एवढा IQ तर आइनस्टाइनचा पण नव्हता राव!

तिच्या बुद्धिमत्तेसाठी तिला ब्रिटिश मेन्साची मेंबरशीपही देण्यात आलीय. एवढा IQ असणारी राजगौरी ही १७ वर्षाखालील एकमेव मुलगी ठरलीय.

जागतिक स्तरावर एवढा जास्त IQ असणाऱ्या केवळ २० हजार व्यक्ती आहेत आणि त्यापैकी राजगौरी एक आहे.  ती भारतीय असल्याबद्दल आपण सर्वांना तिचा अभिमान वाटत राहील हे नक्की.

सबस्क्राईब करा

* indicates required