नागनाथ मंजुळेंना कायदेशीर नोटीस

सैराट बॉक्स ऑफीसला तुफान चालतो आहे. सैराटने तरुण पिढीला "याड" लावले आहे. अनेक उलटसुलट चर्चा आणि वाद-प्रतिवादाने सैराट गाजतो आहे.

आता यात भर पडली आहे प्रणिता पवार या सिनेनिर्मातीने नागनाथ मंजुळे यांना पाठवलेल्या कायदेशीर नोटीसची!! सैराटमधील स्त्री जातीचा अपमान करणार्‍या विशिष्ट संवादाला आक्षेप घेऊन त्यांनी नागनाथ मंजुळे यांनी मीडियासमोर माफी मागावी असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. प्रणिता पवार यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहीती दिली. 


आर्चीसोबत पळून जाण्याचा बेत आखल्यावर शिक्षक भेटायला येतात  तो संवाद आक्षेपार्ह आहे आणि तो चित्रपटातून काढून टाकावा अशी मागणी प्रणिता पवार यांनी केली आहे. (संदर्भ बातमी "बहुजनसमाज लोकनायक" दिनांक १३/०५/२०१६) प्रणिता पवार यांनी घेतलेल्या आक्षेपाचे पुढे काय होते ते येत्या काही दिवसात कळून येईलच पण तोपर्यंत " सैराट" च्या प्रसिद्धीच्या केकचा एक स्लाईस प्रणिता पवार यांना मिळणार हे खरेच आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required