मोदींच्या पोलादी पंजात युवराज!!
इंग्लडचे राजपुत्र विल्यम्स आणि त्यांची पत्नी केट मिडलटन हे गेल्या एका आठवड्यापासून भारताच्या दौऱ्यावर आहेत. क्रिकेट खेळणे, बॉलिवूड सेलिब्रेटीजना भेटणे आणि थोडीफार समाजसेवा करून झाल्यावर पुढचा टप्पा होता अर्थात आपले लाडके पंतप्रधान मोदी यांना भेटण्याचा. अशा भेटीत हस्तांदोलन करतानाचा फोटो काढणे ही तर परंपराच आहे.
पण वरकरणी जरी या फोटोत प्रिन्सच्या चेहऱ्यावर हसू असले तरी प्रत्यक्षात त्याला मोदींच्या पोलादी पंजाची पकड अनुभवायला मिळाली. मोदींची पकड एवडी जोरदार होती कि गोऱ्या राजपुत्राच्या गुलाबी हातांवर मोदींच्या पकडीचे ठसे उमटले.

यापूर्वीही मोदींच्या हस्तांदोलन पद्धतीबद्दल प्रश्न निर्माण झाले होते जेव्हा मायक्रोसॉफ्ट चे CEO सत्या नाडेला यांना मोदींसोबत हस्तांदोलन केल्यानंतर हात पुसताना कॅमेराने पकडले होते.
इमेज स्त्रोत: india.com




