६ वर्ष आणि ७,२०,००० फोटोनंतर मिळाला हा 'परफेक्ट' क्लिक!!

आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी किती चिकाटी आणि जिद्द हवी,  हे ‘अॅलन मॅकफायडन’ या वाइल्डलाईफ  फोटोग्राफरला बघून समजतं. त्याने तब्बल ६ वर्ष फक्त एका परफेक्ट फोटोसाठी खर्च केले आणि यादरम्यान चक्क ७ लाख २० हजार वेळा प्रयत्न केला. शेवटी त्या एका फोटोने अॅलनच्या मेहनतीचं चीज केलं.

हाच तो परफेक्ट क्लिक ! (स्रोत)

किंगफिशर म्हणजे आपला खंड्या पक्षी मासे पकडायला जेव्हा पाण्यात सूर मारतो तेव्हाचा अगदी परफेक्ट फोटो अॅलनला हवा होता. फोटोत दिसत असल्याप्रमाणे ज्या सेकंदाला खंड्याची चोच पाण्याला भेदणार असते, त्याच वेळचा फोटो अॅलनने काढलाय.  पण हे काही केल्या साध्य होत नव्हते. अशावेळी माणसाच्या सहन शक्तीची परीक्षा होते आणि अॅलन यात पैकीच्या पैकी गुण मिळवून पास झाला.

२००९ पासून एकाच जागी ६ वर्षात तब्बल ४२०० तास वाट बघितल्यानंतर अखेर खंड्याने पाहिजे तशी पोज दिली. अॅलन मागील अनेक वर्षांपासून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतोय, पण त्याने सांगितलं की शेकडो फोटो काढूनसुद्धा या फोटोने माझं मन जिंकलं आहे.

 

अॅलनने काढलेले आणखी काही अप्रतिम फोटो !

 

सबस्क्राईब करा

* indicates required