computer

बंदूकीचा नेम नेहेमीच चुकतो -विचारांची तोफ धडधडतच राहते...

५ सप्टेंबर हा दिवस भारतीय इतिहासातला आणखी एक काळा दिवस ठरला. ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.. गौरी लँकेशा यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांच्याच बंगळूरूमधल्या  घराबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

मंडळी, असे भ्याडपणे गोळ्या झाडून माणसाचं तोंड बंद करणे हे काही नवीन नाही. विरोधात बोलणाऱ्यांची या आधीसुद्धा अनेकदा हत्या झाली आहे. फक्त यात आणखी एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे "गौरी लंकेश". 
तर आज आपण बघणार आहोत अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्यात बळी पडलेले पत्रकार आणि विचारवंत...

१.  संदीप कोठारी 

जमीन घोटाळा आणि अवैध खाणकामाविरोधात आवाज उठवल्या प्रकरणी संदीप कोठारी यांचा बालाघाट, मध्य प्रदेश मध्ये खून करण्यात आला. संदीप कोठारी हे 'नई दुनिया ' या वृत्तपत्रासाठी पत्रकारिता करत होते. 

२. जगेंद्र सिंह 

उत्तर प्रदेशमधील शहाजहांपूर येथे जगेंद्र सिंह यांना जाळून ठार करण्यात आले. उत्तर प्रदेश मधील मंत्री राममारुती सिंह यांचे अवैध धंदे उघडकीस आणल्या प्रकरणी त्यांना कायमचे गप्प करण्यात आले. 

३. रामचंद्र छत्रपती 

बलात्काराच्या गुन्ह्याखाली कोठडीत असलेल्या राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाचं सत्य उघड केल्या प्रकरणी २००२ मध्ये त्यांची हत्या झाली. आज ज्या कारणासाठी राम रहीम जेलमध्ये आहे ते सर्व खुलासे या माणसाने आधीच करून ठेवले होते. शेवटी इतक्या वर्ष नंतर या 'बाबा ' ला शिक्षा झाली. 

रामचंद्र हे 'पुरा सच इन सिरसा; या वृत्तपत्राचे संपादक होते. 

४. राजदेव रंजन

राजदेव हे बिहारमध्ये  हिंदुस्थान या वृत्तपत्रासाठी पत्रकारिता करायचे. मोहम्मद शहाबुद्दीन या नेत्याच्या गुन्ह्यांना समोर आणल्यामुळे राजदेव यांना जीव गमवावा लागला. आश्चर्य म्हणजे मोहम्मद शहाबुद्दीन हे तब्बल चार वेळा संसद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. भाडोत्री मारेकऱ्यांनी राजदेव यांच्यावर गोळ्या झाडल्या. 

५. नरेंद्र दाभोलकर 

दुर्दैवाने ही हत्या आपल्या महाराष्ट्रात घडली आहे. अंधश्रद्धा विरोधात आवाज उठवणाऱ्या आणि तथाकथित धर्मसत्तेला आवाहन देणाऱ्या दाभोलकरांसारख्या विचारवंताला पुण्यात गोळ्या झाडून मारण्यात आले. या नतंर जणू अशा खूनसत्राला सुरुवातच झाली. 

६. गोविंद पानसरे 

दाभोलकरांच्या खुनानंतर काही वर्षातच गोविंद पानसरेंची कोल्हापुरात हत्या करण्यात आली. राजकारणातील उजव्या विचारसरणीला विरोध केल्यामुळे त्यांना २० फेब्रुवारी, २०१५ साली ठार केले गेले. वैचारिक हत्येची ही  दुसरी वेळ होती. 

७. एम एम कलबुर्गी 

साहित्य अकादमी सन्मानित कलबुर्गी यांची धारवाड येथे त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. त्यांच्या विचारसरणीमुळे त्यांनी कर्नाटकातील 'लिंगायत समाजाचा रोष ओढवून घेतला होता. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याच्या करणास्तव त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला गेला होता. शेवटी पानसरेंच्या हत्येनंतर काही महिन्यातच ३० नोव्हेंबर, २०१५ रोजी कलबुर्गींची हत्या झाली. 

मंडळी अश्या भ्याड हल्ल्यांनी विचार कधीही मारत नसतो, तो उलट वणव्याप्रमाणे आणखी पसरत जातो हेच सत्य आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required