महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एक तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान होणार !!

मंडळी, आयर्लंडच्या पंतप्रधानपदी लिओ वराडकर विराजमान झाले. लिओ हे उघडपणे स्वीकृत असलेले समलैंगिक पंतप्रधान आहेत. एक भारतीय समलैंगिक व्यक्ती परदेशात जाऊन देशाच्या उच्च पदापर्यंत पोहोचू शकते,  पण त्याच व्यक्तीच्या देशात समलैंगिक व्यक्तीला साधी ग्रामपंचायत निवडणूक तरी लढवता येईल का? अशी ओरड काही महिन्यांपूर्वी ऐकू येत होती. 

या मानसिकतेला फाटा देणारी एक ऐतिहासिक घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एक तृतीयपंथी उमेदवार सरपंच होणार आहे. माळशिरस तालुक्यातील ‘तरंगफळ’ गावात दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ‘ज्ञानदेव कांबळे’ ही तृतीयपंथी व्यक्ती निवडणूक जिंकली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलं आहे.

राव, बदलाचे वारे वाहत आहेत ते असे...

सबस्क्राईब करा

* indicates required