computer

अभिनंदन विरुष्का.. पाहा इटलीत झालेल्या विवाहसोहळ्याचे फोटो..

गेले काही दिवस चर्चांना नुसतं उधाण आलं होतं. पत्रकार तर कोण कुठे जातेय यावर कावळ्यासारखी नजर ठेऊन होते. अनुष्काचं कुटुंब कुठे गेलं? शर्मा कुटुंबाचे पूजापाठ करणारे गुरुजी देशाबाहेर गेले,  विराट कधी आणि कुठे गेला? क्रिकेटर्सपैकी कोण देशाबाहेर जात आहे?? एक ना दोन.. त्यातच ऑस्ट्रेलियातल्या ॲडलैड मैदानाच्या व्यवस्थापनानं, "या, आमच्या या मैदानावर लग्न करा.", असं जाहीर आमंत्रणही दिलं होतं.

थोडक्यात, भारतात आणि क्रिकेटजगतात दुसरं जणू काही बोलण्यासारखं राहिलंच नव्हतं!!

या दोघांचं प्रेमप्रकरण काही लपून राहिलं नव्हतं आणि आधीच्या काहीशा उद्धट विराटला अनुष्काने कसं माणसाळवलंय याचं विराटने इतकं कौतुक करून झालं होतं,  की आता फक्त अक्षता कधी पडतात हाच एक प्रश्न होता. असो, लग्न ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे, त्यामुळे कुणी ते कसं, कुठे आणि कुणाच्या उपस्थितीत करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळं साऱ्या पापाराझींना दूर ठेवत या दोघांनी इटलीत बोर्गो फिनोखिएटो (BORGO FINOCCHIETO) इथं हिंदू पद्धतीनं लग्न केलंय. 

पाहा लग्नाचे दोघांनी शेअर केलेले काही फोटोज..
 

 विराटने सब्यसाचीने डिझाईन केलेली शेरवानी घातली होती तर अनुष्कानेसुद्धा सब्यसाचीने डिझाईन केलेला लेहंगा घातला होता. 

मेहंदी..

विराट आणि अनुष्काने एकच फोटो शेअर केला असला तरी त्यांच्या मित्रमंडळींनी इतर फोटो त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

गोड गोजिरी नवरी..

हँडसम नवरा मुलगा..

रिसेप्शन

लग्न खाजगी समारंभात झालं असलं तरी कुटुंबियांसाठी दिल्लीत तर क्रिकेटर्स आणि सिनेमातल्या लोकांसाठी मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आलंय. ही आहे रिसेप्शनची पत्रिका..

अनुष्काचे ट्वीट..

विराटचे ट्वीट..

बोर्गो फिनोखिएटो(BORGO FINOCCHIETO)

इथं झालं हे लग्न..

 

सर्व फोटोज ट्विटरवरुन साभार

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required