जपान्यांनी बनवलेला बॅटमॅन लगेचच बघून घ्या मंडळी!!
Subscribe to Bobhata
भाई, बॅटमॅन हा आपला एक आवडता सुपरहिरो आहे. ब्रूसभाऊ वेन यांच्या लाईफवरचे अनेक पिच्चर आम्ही पाहिले आहेत. बॅटमॅन ट्रिलॉजी हा आमचा जिव्हाळ्याच्या विषय. पण आज काल बेन अफ्लेकने केलेला बॅटमॅन आम्हाला नाही आवडत. तसंही डिशी कॉमिक्सवाले भैसटल्यासारखे पिच्चर काढायलेत.
ते सगळं सोडा, पण आपला आवडीचा बॅटमॅन आणि त्याहूनही आवडीचा व्हिलन आपले जोकर भाऊ हे निन्जा स्टाईलने एकमेकांसमोर आले तर मजा येईल ना?? येस, तेच घेऊन आलोय आज आम्ही तुमच्यासाठी. बॅटमॅन निन्जा या जपानी ऍनिमेचे ट्रेलर बघून घ्या भाऊ...
जपान बॅटमॅनकडे कसं बघतो हे म्हणजे हा चित्रपट आहे. भाऊ बॅटमॅनचे हे नवं रूप आम्हाला तर इंटरेस्टिंग वाटतंय. तुमचं याबद्दल काय मत आहे? जाता जाता ,भारतात बॅटमॅन बनला तर कसा बनेल याचा पण विचार करा..




