बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार नवाजुद्दीन सिद्दिकी...!!

नवाजुद्दीन सिद्दिकी या तगड्या कलाकाराने आपल्या अभिनयाचे अनेक पैलू आत्ता पर्यंत दाखवले आहेत. लहान सहान भूमिकांपासून ते सलमान, शाहरुख, आमीर या खान मंडळींच्या बरोबरीने केलेल्या भूमिका पर्यंत त्याने आपली चमक दाखवली आहे. अश्या या कलाकाराला आपण आता एका नव्या रुपात बघणार आहोत. आणि हे रूप देखील तेवढंच तगडं असणार आहे. हा रोल असेल ‘बाळासाहेब ठाकरे’ यांचा !!
बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं व्यक्तिमत्व साकारायला त्याच तोडीचा अभिनेता हवा होता. आता अश्या बातम्या येत आहेत की हा रोल नवाजुद्दीन सिद्दिकीकडे आलेला आहे. DNA ने दिलेल्या बातमी प्रमाणे या सिनेमाची निर्मिती शिवसेना करणार आहे. आणखी एका बातमी नुसार संजय राऊत यांनी या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली आहे.
नवाजुद्दीनच्या आधी हा रोल अमिताभ बच्चन यांनी करावा अशी अपेक्षा होती. अमिताभ बच्चन यांच्या शिवाय अक्षय, शाहरुख, मनोज वाजपेयी यांचा सुद्धा विचार करण्यात आला होता. शेवटी नवाजुद्दीनला निवडण्यात आलं. फिल्मचा दिग्दर्शक कोण असेल हे अजून समजलेलं नाही शिवाय आणखी कलाकार कोण असतील हेही गुलदस्त्यात आहे. फिल्मची अधिकृत घोषणा २१ डिसेंबर रोजी होईल.
मंडळी, फिल्म जर शिवसेनेकडून तयार करण्यात येत असेल तर ती फिल्म किती निरपेक्ष पद्धतीने तयार केली जाईल. हा प्रश्न उरतोच. तूर्तास आपण २१ डिसेंबरची वाट बघू शकतो.
मंडळी, नवाजुद्दीन बाळासाहेबांच्या भूमिकेत कसा वाटेल ? तुम्हाला काय वाटतं ?