काय आहे हा, झिम्मा की पिंगा?

२००९च्या सा रे गा मा लिटल चॅंप्सच्या फायनल यादीत आलेली  आसामची छोटी गायिका अंतरा नंदी,  बहीण अंकितासोबत घेऊन आलीय एक अफलातून गाणं एका वेगळ्याच ढंगात. तिच्या गाण्याला साथ सोबत आहे ती एका टेबलाची आणि टाळ्यांची. ’पिंगा’ हे गाणंही तसं झिम्मा फुगडी खेळताना म्हणायचं गीत. या दोघी हे गाणं गाताना मात्र टेबलाचीही साथ घेतात. 

गाण्याचं अंग असलेल्या या बहिणी कधी टेबल वाजवत तर कधी कधी झिम्मा खेळत या गाण्यात आपल्याला गुंगवून टाकतात. महाराष्ट्राची कन्या मिथिला पालकर ही अशीच एका कपाच्या ठेक्यावर गाणी म्हणते. नव्या पिढीनं गान संस्कृती वेगळ्याच पद्धतीने आपलीशी केलीय. हो ना? 

सबस्क्राईब करा

* indicates required