मुंबईकरांनो तुम्ही आजचा सुंदर सूर्योदय अनुभवला की नाही ?
रोजच्या सकाळसारखीच आजची सकाळ होती, सूर्य पुर्वेतूनच उगवला, रात्र संपली, कामं सुरु झाली...पण आज काही तरी वेगळं होतं. काय वेगळं होतं ? काय बरं ? मंडळी आजचा सूर्योदय वेगळा होता. वेगळा होता म्हणजे अहो तुम्हीच बघा ना !!

बघितलं ? असं वाटत आहे की निसर्गाने सुंदर रंग पांघरलेत आणि तो एका फोटो क्लिक साठी पॉज घेऊन उभा आहे. आकाशात ही रंगांची उधळण झाली ती आज म्हणजेच २० डिसेंबर रोजी.
ज्यांना रोज सकाळी लवकर उठण्याची सवय आहे त्यांना हे अप्रतिम दृश्य बघता आलं आणि आपल्या कॅमेऱ्यात कैद पण करता आलं. पण जे आळशी होते त्यांच्यासाठी आम्हालाच सोय करावी लागली राव. खालील फोटो बघा आणि आज तुम्ही जे मिस केलं ते इथे अनुभवा. दिवसाची सुरुवात नाही तर नाही पण संध्याकाळ छान जाईल !!










