ह्या टिप्सचा तुम्हाला बोर्डाच्या रिझल्टच्या दिवशी नक्कीच फायदा होईल

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आत्तापर्यंत तुम्हाला तुमचा बारावीचा निकाल कळला असेलच. नसेल तर वेबसाईटवर पाहाता येईलच. आमच्या अनुभवावरून सांगतो या निकालाने तुमच्या आयुष्यावर किंवा करिअरवर फार काही मोठा परिणाम पडत नाही. तुम्ही पुढे कधीही तुमच्या मनाप्रमाणे तुमचे करिअर बदलू शकता. तर आता हे ज्ञान पुरे करूयात आणि मुख्य प्रश्नाकडे वळूयात. आजवरच्या आमच्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून घेऊन आलो आहेत रिझल्टच्या दिवशी वापरायच्या टिप्स :-
- आजच्या दिवशी तुम्हाला नातेवाईक आणि शेजारी या दोन प्राण्यांपासून खूप धोका आहे. ना जाणो कोण तुम्हाला कुठून पकडेल आणि विचारेल, “काय, बारावीत ना तू? आज निकाल ना तुझा? किती टक्के मिळाले?”
- तुम्हाला कितीही टक्के मार्क मिळाले तरी चेहऱ्यावर जास्त आनंद दाखवू नका. वरच्या प्राणिसंग्रहालयातला एक तरी प्राणी “बाकीचा 1 टक्का कुठे गेला” विचारायला कमी करणार नाही.
- तुम्हाला जर 83% मार्क मिळाले असतील तर बिनधास्त 93% सांगून टाका. फक्त तुमचे आई किंवा बाबा तुमचा पचका करणार नाहीत यासाठी त्यांना पण या प्लॅनमध्ये सामील करून घ्या
- आजचा दिवस तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतच घालावा. घरी परतताना सिक्युरिटी गार्ड ही तुमची शिकार करू शकेल.
- एवढे सगळे करून तुमच्या छान मार्कांवर तुम्ही आणि तुमच्या घरचे जर खुश असाल, तरीही संध्याकाळपर्यंत वाट पहा. तुमच्या ’आत्याच्या पुतण्याला तुमच्यापेक्षा जास्त मार्क कसे” हा प्रश्न नक्कीच येईल.
तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आत्महत्या वगैरे करून काही साध्य होत नाही. पण हे उपाय केलेत तर तुमचे फ्रस्ट्रेशन नक्कीच कमी होईल.