बापरे, ही बाई शरीरातल्या हृदयाशिवाय कशी जगतेय ??

मंडळी, फोटोमध्ये दिसणारी महिला पाठीवर फक्त बॅग घेऊन उभी नाही.. तर ती पाठीवर तिचं हृदय घेऊन उभी आहे. सेल्वा हुसैन (वय ३९) असं या महिलेचं नाव. २०१७ च्या जुलैमध्ये तिचा हार्टफेल झालं. यावेळी तिची शारीरिक स्थिती इतकी गंभीर होती की तिचं ‘हार्ट ट्रान्सप्लांट‘ करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिला एक आर्टिफिशियल हृदय शरीराबाहेर देण्यात आलं.

मंडळी तिच्या पाठीवर असलेल्या बॅगेत तिचं हेच आर्टिफिशियल हृदय ठेवलेलं आहे. या बॅगेत दोन बॅटरींवर चालणारा पंप असून इलेक्ट्रिक मोटार बसवली आहे. या पंपातून बलूनद्वारे तिच्या शरीरातील दोन प्लास्टिक चेम्बर्समध्ये हवा पोहोचवली जाते. हे काम बेंबीपासून फुफ्फुसापर्यंत फिक्स केलेल्या २ ट्यूबद्वारे केलं जातं. अशाप्रकारे तिच्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया खरोखरच्या हृदयासारखी नियमित होत राहते.

या शिवाय सेल्वाकडे आणखी एक बॅग आहे. या बॅगेत बॅकअप युनिट ठेवलेलं असतं. जर कधी बॅगेतील सिस्टम बिघडली तर ९० सेकंदांच्या आत ही बॅकअप युनिट लावावी लागते. याच कारणाने सेल्वा एकटी बाहेर जाऊ शकत नाही. तिच्या बरोबर तिचा पती किंवा सहाय्यक असणं गरजेचं असतं.

स्रोत

सेल्वा हुसैन ही जगातली दुसरी अशी व्यक्ती आहे जिला आर्टिफिशियल हृदय बसवण्यात आलेलं आहे. या आर्टिफिशियल हृदयाची किंमत तब्बल ७४ लाख आहे. ६ तासांच्या ऑपरेशन नंतर तिला आर्टिफिशियल हृदय मिळालं. पण हे हृदय बसवण्याआधी तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या.

वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीमुळे सेल्वासारख्या महिलांना त्यांचं आयुष्य पुन्हा मिळालं आहे.

 

आणखी वाचा :

काय ? तो १८ महिने हृदयाशिवाय जगला ??

सबस्क्राईब करा

* indicates required