दिनविशेष: २६ मे हा दिवस ऑस्ट्रेलिया मध्ये नॅशनल सॉरी डे म्हणून साजरा केला जातो

पृथ्वीवरच्या पाच खंडांपैकी  धाकटे दूर पडलेले भावंड म्हणजे ऑस्ट्रेलीया. सतराव्या शतकापासून ब्रिटीश दर्यावर्दींची ये जा सुरु झाली आणि हळूहळू  ब्रिटीश वसाहती  स्थायीक झाल्या. नविन वसाहती म्हणजे मूलनिवासींशी संघर्ष ओघाने आलाच.

असे मानले जाते की ऑस्ट्रेलीयाचे मूलनिवासी चाळीस ते पन्नास हजार वर्षांपासून तेथे नांदत होते. त्यांची संस्कृती आणि त्यांचा वंश हा तेथे नव्याने स्थायीक झालेल्या उपर्‍यांपेक्षा वेगळा होता. यानंतर झालेल्या संघर्षात मूलनिवासी वेगळे, एकटे पडत गेले. त्यांचा वंश नाहीसा होऊ नये म्हणून सरकारने काही उपाय योजना केल्या. मूल आदिवासी मुलांना त्यांच्या कुटुंबातून वेगळे काढून त्यांना नविन संस्कृतीत सामील करणे हा त्यापैकी एक कार्यक्रम होता. परंतू योजना राबवताना ज्या पध्दतीने मुलांना हिरावून घेण्यात आले त्याची तुलना वंश संहारासोबत झाली.

बरीच वर्षे सामाजीक कार्यकर्ते या  योजनेवर टिका करीत होते आणि सरकारने याबद्द्ल माफीनामा संसदेत मांडावा असा आग्रह करत होते.  १९९८ पासून  दरवर्षी  २६मे हा नॅशनल सॉरी डे म्हणून ऑस्ट्रेलीयात साजरा केला जातो. प्रत्यक्षात सरकारी माफीनामा मात्र २००७ साली पंतप्रधान केव्हीन रुड यांनी संसदेसमोर मांडला. त्यायील  महत्वाचा अंश असा होता.


"We apologize especially for the removal of Aboriginal and Torres Strait Islander children from their families, their communities and their country."

सबस्क्राईब करा

* indicates required