'याला कोणी तरी सुट्टी द्या रे'...या पाकिस्तानी मुलाने असा अर्ज मांडला की शिक्षकांनाही हसू आवरलं नाही !!

शाळेतून घरी येण्याचे तीन मार्ग :

१. मधल्या सुट्टीत पळून जाणे.

२. आजारी असल्याचं सांगणे.

आणि तिसरा आणि इमानदारीवाला मार्ग

३. निमूटपणे शाळा सुटल्यावर घरी येणे.

ताप आलाय, पोटात दुखतंय, डोकं दुखतंय, इत्यादी गोष्टी सांगून शाळेतून घरी पाळण्याचे फंडे आता जुने झालेत राव. काही वर्षांपर्यंत या आयडिया चालायच्या. पण आजच्या  काळात असले चिंधी बहाणे न करता सरळ सरळ सुट्टी मागण्याची पद्धत आलेली आहे. भाऊ यातही लेजेंड लोकांनी वेगळी शक्कल लढवलीये.

या मुलाने सुट्टी मागण्यासाठी जे केलंय ते आज पर्यंत कोणीही केलं नव्हतं. याने सरळ सरळ आपल्या सुरेल गळ्याचा आणि आपल्या फर्स्टक्लास इंग्लिशचा वापर करून शिक्षकांसमोर अर्ज  मांडलाय. तेही एका गाण्यात बरं का....

या मुलाला एवढी चांगली इंग्लिश येते की त्याने फुलइस्टॉप आणि कॉमाला सुद्धा गाण्यात घेऊन चक्क इंग्लिशलाच कोमात पाठवलं आहे. आम्ही खूप लेक्चर दिलं. तुम्हीच बघा एकदाचं....

हा व्हिडीओ अपलोड केलाय पाकिस्तानी गायक ‘शहजाद रॉय’ याने. २१ जानेवारी २०१८ ला व्हिडीओ ट्विटरवर आल्यानंतर लगेच व्हिडीओने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. शहजादपासून ते सोशल मिडीयावर जो तो या मुलाला सुट्टी द्या म्हणतोय राव. त्याचं हे सुरेल गाणं ऐकून आतापर्यंत त्याला कदाचित सुट्टी मिळालीही असेल.

मोलाचा सल्ला : आयडिया चांगली असली कामाला दांडी मारण्यासाठी कोणी याचा वापर करू नये. बॉस म्हणजे शिक्षक नव्हे !!

सबस्क्राईब करा

* indicates required