मुतारी वापरली म्हणून लागला 'जीएसटी'...तामिळनाडूच्या हॉटेलचा प्रताप !!
मंडळी तुम्ही ‘शु’ ‘शी’ करण्यासाठी कधी ‘जीएसटी’ दिलाय का? आता तुम्ही म्हणाली काय चेष्टा करताय राव, या कामासाठी कोण देतंय जीएसटी? ५ रुपये दिले की झालं काम. पण मंडळी नुकत्याच घडलेल्या एका घटनेने असं वाटतंय की आता सगळ्याच गोष्टींवर 'जीएसटी’ लागणार आहे, अगदी तुमच्या ‘हलक्या’ होण्याला देखील.

तर झालं असं की, एक माणूस तामिळनाडू च्या एका हॉटेलमध्ये गेला असता तिथे त्याने टॉयलेटचा वापर केला. तो बाहेर आल्यानंतर हॉटेल वाल्यांनी त्याच्या हातात पद्धतशीरपणे बिल टेकवलं. सहसा टॉयलेटच्या बाहेर पैसे घेतले जाऊ शकतात. पण या माणसाच्या बाबतीत जे घडलं ते कदाचित कोणाबरोबरही घडलं नसेल. या माणसाला त्याच्या टॉयलेट वापरण्यावर बिल तर मिळालंच, पण बिलााातत चक्क ‘जीएसटी’ चार्ज करण्यात आला होता. एकूण हिशोब असा होता :
टॉयलेट वापरण्याचे १० रुपये
+ पार्सल चार्ज ५० पैसे
+ CGST २६ पैसे
+ SGST २६ पैसे
- राऊंड व्हॅल्यू ०३
____________
एकूण = ११ रुपये
यात हद्द होती ती पार्सल चार्जची. आता मुतारी वापरल्यावर पार्सल चार्ज कसला ब्वा? या बिलाकडे बघून हसावं की रडावं हा प्रश्न पडतोय. पण या माणसाने कसलाही प्रश्न न विचारता बिल दिलं आणि मोकळा झाला. हे बिल त्याने सोशल मिडीयावर अपलोड केल्यानंतर लोकांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मंडळी, हे बघितल्यानंतर नक्कीच प्रश्न पडतो की, आता आणखी कोणकोणत्या गोष्टींसाठी जीएसटी भरायचा बाकी राह्यलाय ?
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा...भाऊ कमेंट बॉक्स त्यासाठीच आहे !!




