भारतातल्या लुबाडणूकीपासून कसे वाचायचे याचे धडे देतोय हा फिरंगी माणूस !!

Subscribe to Bobhata

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी पर्यटनस्थळावर वेगळे चार्जेस असतात. हे पैसे सरकारकडून ठरवलेले असतात. हे अधिकृत चार्जेस असले तरी फॉरेनर्ससाठी भारतात काही अनधिकृत चार्जेस देखील आहेत. जसं, प्रवासात कोणताही फॉरेनर दिसला की रिक्षावाले आणि खाजगी वाहनचालक त्याला पैसे वाढवून सांगतात. कारण हे पाहुणे तर परदेशी आहेत आणि परदेशी लोकांकडे तर डॉलरमध्ये पैसा असतो. यात एक गोष्ट गृहीत धरली जाते ती म्हणजे या गोऱ्या माणसाला आपली भाषा कुठे समजते. त्यामुळे तोडक्या मोडक्या इंग्रजीत बोलून त्याला गंडवलं जातं.

मंडळी, असाच एक प्रकार एका इंग्लिश बाबूने कॅमेऱ्यात कैद केलाय. हा माणूस 'India Survival Guide' या युट्युब चॅनेलच्या माध्यामातून भारत भेटीला येणाऱ्या माणसांना भारतात प्रवास करण्याबाबत टिप्स देत असतो.

स्रोत

या व्हिडीओत तो दिल्लीतल्या ‘हुमायून मकबरा’ भागातल्या रिक्षावाल्यांशी घासाघीस करत आहे. हे रिक्षावाले हुमायून मकबरा’ ते ‘खान मार्केट’ पर्यंत जाण्यासाठी त्याला तब्बल १५० रुपये मागत आहेत. हे अंतर फक्त ३.५ किलोमीटर आहे आणि एवढ्या अंतरासाठी फक्त ४१ रुपये होतात.

शेवटी तोही मागे हटला नाही आणि त्याने घासाघीस करून ७० रुपये भाड्यावर रिक्षा पकडली. पुढे जेव्हा त्याला खान मार्केट ते ‘इंडिया गेट’ पर्यंत रिक्षा करायची होती तेव्हा पुन्हा एका रिक्षावाल्याने त्याला १५० रुपये भाडं मागितलं, पण अधिकृतरीत्या फक्त ३३ रुपये होत होते.

स्रोत

रिक्षावाल्याने एक गोष्ट माहित नव्हती की हा माणूस इंग्रज असला तरी त्याला हिंदी समजतं. व्हिडीओमध्ये त्याने म्हटलंय की भारतात प्रवास करणे परदेशी पर्यटकांसाठी कठीण आहे. या लुटमारीला बघून आपल्यालाही हे जाणवेल. मग प्रश्न पडतो की ‘अतिथी देवो भवः’ या अतुल्य भारतच्या ब्रीदवाक्याचं काय ?

अर्थात हे झालं फिरंगी लोकांबद्दल. पण चेन्नईसारख्या ठिकाणी वेगळ्या भाषेच्या लोकांनाही अशीच वागणूक मिळते बरं.

सबस्क्राईब करा

* indicates required