हा न्यूज रिपोर्टर बाथटब मध्ये काय करतोय भाऊ ?

श्रीदेवी यांच्या जाण्याने त्यांचे चाहते आणि फिल्मी जगतातले लोक हळहळले. त्यांचा मृत्यू कसा झाला यावर चर्चा सुरु झाल्या. सुरुवातीला त्यांचा मृत्यू कार्डियॅक अॅरेस्टमुळे झाला अशी बातमी आली. मग पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यां बाथटब मध्ये बुडून मेल्याची नवी बातमी हाती आली. या एका मागून एक बातम्या येत गेल्या आणि उलटसुलट चर्चांना उधाण आलं.

स्रोत

स्रोत

मंडळी या सगळ्या बातम्या आपल्या पर्यंत पोहोचवणाऱ्या वृत्तवाहिन्या दिवसभर या एकाच गोष्टीच्या मागे लागल्या. “श्रीदेवी” हा एकच विषय गेल्या ५ दिवसांपासून रंगत आहे. त्या खूप उत्कृष्ट अभिनेत्री होत्या यात शंकाच नाही, पण काही वाहिन्या ज्या प्रकारे या बातम्या देत होत्या त्यावरून तर असं वाटत होतं की देशात बातमी देण्यासारखं काही उरलेलंच नाही.

मंडळी या गोष्टीचा कहर तर तेव्हा झाला जेव्हा ‘महा न्यूज’ या तेलगु वृत्तवाहिनीने चक्क श्रीदेवी यांचा मृत्यू कसा झाला असावा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. या प्रात्यक्षिक मध्ये न्यूज रिपोर्टर चक्क स्वतः बाथटब मध्ये उतरून आपल्याला संपूर्ण माहिती देत आहे. हा व्हिडीओ युट्युबवर देखील आहे. त्यांनी याला नाव देतानाच म्हटलंय की ‘श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटब मध्ये बुडून होणं शक्यच नाही.’ याचा अर्थ या लोकांचा पोस्टमॉर्टमवर विश्वास नसून आपल्या परीक्षणावर जास्त विश्वास आहे.

आम्ही जास्त काही सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा हा व्हिडीओ. तुम्हाला यातली भाषा समजली नाही तरी विनोद नक्की कळेल.

मंडळी आपल्याकडच्या वृत्तवाहिन्यांच्या या कारभारावर दुबईच्या ‘खलिज टाइम्स’ या वृत्तपत्राने ‘संयम’ बाळगा म्हणून सल्ला दिला आहे. हा सल्ला कितपत मानला जातो ते भविष्यच सांगेल.

सबस्क्राईब करा

* indicates required