computer

हे आहेत सर्वात जास्त काळ राज्य करणारे १२ हुकुमशहा...लिस्ट बघून घ्या भाऊ !!

एक काळ असा होता जेव्हा राजे महाराजे होते. त्यानंतर हुकुमशाही राजवट आली आणि हुकुमशाही जाऊन लोकशाहीचा जगात प्रसार झाला. राजेशाही किंवा हुकुमशाही पद्धत कमी झाली असली तरी नष्ट झालेली नाही. आज ४९ देशांमध्ये हुकुमशाही किंवा राजेशाही पद्धतीने देशाचा कारभार चालवला जातो. सौदी अरेबिया, इराण, उत्तर कोरिया, कतार, ओमन ही त्यातलीच प्रमुख नावे.

मंडळी, हुकुमशहा हा जसा सत्तेत येण्यासाठी रक्तपात करतो तसचं त्याला सत्तेतून हाकलण्यासाठी सुद्धा रक्तपात केला जातो. जुना हुकुमशहा जाऊन नवीन हुकुमशहा येणे ही हुकुमशाही मध्ये नवीन बाब नाही. एक हुकुमशहा किती काळ राज्य करेल याची खात्री नसते. पण जगात असे काही हुकुमशहा आहेत ज्यांनी त्यांच्या देशावर सर्वात जास्त काळ राज्य केलं. चला तर बघुयात ते हुकुमशहा आहेत तरी कोण.

 

राजवट संपलेले हुकुमशहा :

१. फिडेल कॅस्ट्रो (क्युबा) – ४९ वर्ष

२. चंग काई-शेक (चीन) – ४७ वर्ष

३. किम इल-सुंग (उत्तर कोरिया) – ४६ वर्ष

४. मुअम्मर गद्दाफी (लिबिया) – ४२ वर्ष

५. ओमर बाँगो (गॅबन) - ४१ वर्ष

६. एन्वेर होचा (अल्बानिया) – ४० वर्ष

 

सध्या राज्य करत असलेले हुकुमशहा :

७. पॉल बिया (कामेरून) – ४२ वर्ष

८. तियोदोरो ओबियांग एन्गेमा एम्बासोगो (इक्वेटोरीयल गिनी) – ३८ वर्ष

९. अली खामेनी (इराण) – ३६ वर्ष

१०. नुरसुल्तान नझरबायेव (कझाकस्तान) – ३४ वर्ष

११. डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो (काँगो) – ३३ वर्ष

१२. हून सेन (कंबोडिया) – ३३ वर्ष

सबस्क्राईब करा

* indicates required