डेनिमची नवीन जीन्स आलीये भाऊ...किंमत ऐकून धक्का बसेल !!
फॅशन म्हणून ह्या कंपन्या काय विकायला काढतील त्याचा भरोसा नाय राव. काही महिन्यांपूर्वी ‘मड जीन्स’ चा प्रकार ट्रेन्डिंग झाला होता. ही मड जीन्स म्हणजे चिखलात माखलेली जीन्स होती. आता ही फॅशन पण जुनी झाली. अन् नवीन फॅशन आली आहे. जीन्सच्या बाजारात प्रसिद्ध असलेल्या ‘डेनिम’ने ‘एक्स्ट्रीम कट आऊट’ ही नवीन जीन्स बाजारात आणली आहे. हा प्रकार काय आहे ते तुम्ही खालील फोटो मध्ये पाहू शकता.

मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल, “जीन्स नेमकी आहे तरी कुठं ?”....त्याचं काय आहे ना, तुम्ही जो जीन्सचा काठ बघत आहात तो काठ म्हणजेच जीन्स आहे. लॉस एन्जलिसमधील ‘चार्मर’ या डेनीम ब्रँडने हा प्रकार बाजारात आणलाय. या जीन्सची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे.
हा अतरंगी प्रकार तर एकवेळ आपण समजू शकतो पण याची जी किंमत आहे ती कोणालाच पचनी पडण्यासारखी नाही. या जीन्सची किंमत आहे १६८ डॉलर्स म्हणजेच तब्बल ११ हजार रुपये. एकंदरीत हे पाहिल्यानंतर त्या फॅशन डिझायनरला साष्टांग नमस्कार घालण्याची इच्छा होते.

याला फॅशन म्हणावं का हा सुद्धा प्रश्नच आहे. सध्या फॅशनच्या नावाखाली काहीही विकण्याचा नवीन ट्रेंड आलेला दिसतोय. पण ‘एक्स्ट्रीम कट आऊट’ भलतंच काही तरी आहे राव.
आणखी वाचा :
या चिखलाने माखलेल्या जीन्सची किंमत वाचून थक्क व्हाल...




