या खरोखरच्या 'स्पायडरमॅन'ने तर फ्रेंच सरकारला पण प्रेमात पाडलं...वाचा त्याने काय केलंय ते !!

तुम्ही कधी खरोखरचा स्पायडरमॅन बघितला आहे का ? नसेल बघितला तर या व्हिडीओ मध्ये बघाल राव.

मंडळी, ही घटना पॅरीस मध्ये घडली आहे. एका बिल्डींगच्या बाल्कनी मधून एक लहानगा खाली कोसळणार होता. सुदैवाने मुलाला कोसळण्यापासून एक माणूस रोखून होता. पण मुलगा कोणत्याही क्षणी खाली कोसळेल असं वाटतात होतं. अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली होती पण त्यांना यायला अजून अवकाश होता. अशा आणीबाणीच्या प्रसंगी ‘मामौदू गसामा’ नावाच्या तरुणाने मागचा पुढचा विचार न करता कोणत्याही सुरक्षा साधनाशिवाय ४ मजले चढून मुलाला वाचवलं. काही मिनिटातच तो खरोखरच्या स्पायडरमॅन सारखा मुला पर्यंत पोहोचला.

मंडळी, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मामौदू चं जगभरातून कौतुक होत आहे. त्याच्या या कामाची दखल फ्रांस सरकारने घेतली आहे. फ्रेंच सरकारकडून त्याच्या या शूर कार्याचा सत्कार करण्यात येणार आहे.

मंडळी त्याने हे कसं केलं असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, ‘मी कोणताही विचार न करता मदतीला धावलो...लहानग्याला वाचवल्या नंतर माझं अंग थरथरत होतं....मला उभंही राहता येत नव्हतं......पण मी मुलाला वाचवू शकलो याचा मला आनंद आहे..’

स्रोत

मामौदू आपलं नशीब आजमावायला काही महिन्यांपूर्वीच ‘माली’हून फ्रान्सला आला. त्याच्या कामाची परतफेड म्हणून पॅरीसचे मेयर त्याला शहरात स्थिरस्थावर व्हायला मदत करणार आहेत.

या घटनेतला आणखी एक हिरो म्हणजे तो माणूस ज्याने मुलाचा हात सुटू दिला नाही. मामौदू मुला पर्यंत पोहोचेपर्यंत त्याने मुलाला खाली पडण्यापासून रोखून धरलं होतं.

सबस्क्राईब करा

* indicates required