आता रामदेव बाबा देणार व्हाट्सअॅपला टक्कर! आलंय पतंजलीचं स्वदेशी मेसेजींग अॅप!!

रामदेव बाबांच्या स्वदेशी चळवळीनं भलताच वेग घेतलाय राव! आयुर्वेदीक उत्पादनांपासुन किराणा सामानपर्यन्त, इतकंच काय तर चॉकलेट - बिस्किटांपासुन टुथब्रश पर्यंत... अनेक क्षेत्रात पंतजलीनं मोठं मार्केट काबिज केलंय. नुकतीच पतंजलीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी स्वदेशी सिमकार्ड लॉन्च केल्याची बातमी आली होती. त्यानंतर आता पतंजली कडून चक्कं स्वदेशी इन्स्टंट मेसेजींग अॅपही लॉन्च करण्यात आलंय!!

Kimbho (किम्भो) असं या पतंजलीच्या स्वदेशी मेसेजींग अॅपचं नाव आहे. २८ मे ला लॉन्च झालेल्या या अॅपची टॅगलाईन आहे 'अब भारत बोलेगा.' तुलनात्मक विचार करायला गेल्यास यात आपल्याला स्टिकर्स, क्विकीज आणि डुडल्स वगळता व्हॉट्सअॅपपेक्षा वेगळं असं काही मिळत नाही. त्यामुळे हे किम्भो अॅप म्हणजे एकप्रकारे व्हॉट्सअॅपचीच कॉपी असल्याचं दिसतंय. आतापर्यंत १०,००० हून अधिक जणांनी या अॅपला प्ले - स्टोअरवरून डाऊनलोड केलंय.

स्वदेशी इन्स्टंट मेसेजींग अॅप म्हणून हाईक मेसेंजर अॅपलाही चांगला प्रतिसाद मिळालाय. पाहूया या स्पर्धेत हे नवखं किम्भो अॅप लोकांना कशाप्रकारे आपल्याकडे खेचतं... 

सबस्क्राईब करा

* indicates required