तब्बल २००० शब्द अवगत असलेल्या गोरिलाचं निधन !! नक्की कशी संवाद साधायची ती?

माणूस आणि प्राण्यामध्ये सांकेतिक भाषेत संवाद साधला जाऊ शकतो हे सिद्द करणाऱ्या कोको गोरिलाने नुकताच या जगाचा निरोप घेतला. कोको गोरिला एकमेव अशी गोरिला होती जिला सांकेतिक भाषेत माणसाशी बोलता येत होतं. ती तब्बल २००० शब्द शिकली होती.
सॅनफ्रान्सिस्कोच्या प्राणिसंग्रहालयात ४ जून १९७१ रोजी कोकोचा जन्म झाला. तिचं खरं नाव होता ‘हानाबीको’. हे एक जपानी नाव आहे. तिचं हे नाव पुढे जाऊन बदलण्यात आलं आणि ती ‘कोको’ या नावाने ओळखली जाऊ लागली.
‘दी गोरिला फाउंडेशन’च्या ‘फ्रान्सीन पीटरसन’ने तिचा सांभाळ केला. फ्रान्सीनने तिला २००० अमेरिकन इंग्रजीचे शब्द शिकवले व सांकेतिक भाषेत इशाऱ्याने संवाद साधायला शिकवलं. कोकोने आश्चर्यकारकरीत्या फ्रान्सीनच्या शिकवण्याला प्रतिसाद दिला. तिला तब्बल १००० सांकेतिक इशाऱ्यांनी संवाद साधता येत होतं.
‘फ्रान्सीन पीटरसन’ मानसशास्त्रज्ञ आहे. तिने कोकोला वयाच्या दुसऱ्या वर्षी (१९७२) भाषा शिकवण्यास सुरुवात केली. प्राण्याला भाषा शिकवण्याचा हा एक प्रयत्न होता आणि तो यशस्वी झालाही.
१९ जून रोजी कोकोचा झोपेतच मृत्यू झाला. ती ४६ वर्षांची होती.
मंडळी, आता बघूया कोको कशा प्रकारे सांकेतिक भाषेत संवाद साधायची. बघून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.