स्विस बँकेत खातं उघडायचं आहे ? चला तर, हे नक्की वाचा | भाग १

स्विस बँक आणि त्यातला पैसा यावर बर्‍याच चर्चा सध्या चालू आहेत. तुमच्याही मनात येत असेल की आहे तरी काय हा प्रकार ? तर या पहिल्या भागात थोडक्यात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्विस बँकेत खातं असणं म्हणजे काय आणि ते खातं उघडायचं कसं ते ! समजा तुमच्याकडे लपवा छपवी करण्यासारखं काही नसेल तर स्विस बँकेत खातं उघडणं अगदी सोप्पं आहे पण त्या आधी काही गैरसमज दूर करू या.

पहिला गैरसमज हा की स्विस बँक ही एकच बँक आहे. तसं काही नाही, स्विस बँकाची एकूण संख्या चारशेच्यावर आहे. त्यामध्ये ‘यूबीएस’ आणि ‘क्रेडीट स्युस’ या बँकांकडे ५०% व्यवहार आहेत. या बँकांची कार्यालये पण मुंबई दिल्लीत आहेत.

स्रोत

दुसरा गैरसमज असा की आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसांना इथे खातं उघडता येत नाही. हा एक भ्रम आहे. स्विस बँक ही आपल्याकडे असते तशीच बँक असते. ज्यांचं वय अठरा वर्षांच्या वर आहे अशा कोणालाही इथे खातं उघडता येतं.

तिसरा गैरसमज असा की भारतीयांना स्विस बँकेत खातं उघडता येत नाही. सत्य स्थिती अशी आहे की अनिवासी भारतीयांना (NRI) इथे कधीही खातं उघडता येतं. ज्यांना उद्योग धंद्यांसाठी खातं उघडायचं असेल त्यांना ‘फेमा अॅक्ट’नुसार खातं उघडता येतं. थोडक्यात, भारतातल्या कोणत्याही बँकेसारखीच स्विस बँक असते.

तर मग असं काय खास आहे या खात्यात ?

१. स्विस बँकेत स्वतः जाऊन खातं उघडणं आवश्यक नाही. पोस्टाने फॉर्म मागवून सुध्दा खातं उघडता येतं. फरक इतकाच आहे की जर पोस्टा द्वारे खातं उघडणार असाल तर सर्व कागदपत्रं -पासपोर्टची झेरॉक्स वगैरे Apostille करावे लागतात. अ‍ॅपोस्टील म्हणजे नोटरी किंवा नोटरी सारखे अधिकार असणारी एखादी व्यक्ती. अनेक देशांमध्ये हे अधिकार सरकारी अधिकाऱ्यांना पण दिलेले असतात. हे केलं की खातं उघडलं जातं.

स्रोत

२. स्विस बॅकेत तुम्ही कोणत्याही करन्सीत -म्हणजे चलनात खातं उघडलं तरी चालतं. स्वित्झरलंडची करन्सी आहे -स्विस फ्रँक, या चलनात खातं उघडलं तर मात्र त्यावर कर भरावा लागतो. इतर चलनातलं खातं असलं की कर भरावा लागत नाही, उलट थोडं फार व्याजही मिळतं.

स्रोत

३. स्विस खातं सर्रास शून्य खर्चात म्हणजे आपण ज्याला "झिरो बॅलन्स" म्हणतो तसं उघडत येतं . कमीतकमी जमेची काही अट नसते. पण एकदा पैसे जमा केले की सगळ्या अटी लागू होतात.

 

मंडळी, पुढच्या भागात आपण पाहूयात स्विस खात्याची बोंबाबोंब आहे तरी काय ?

सबस्क्राईब करा

* indicates required