पुलंच्या साहित्यातील निवडक ‘नमुने’ हिंदीत येत आहेत.....प्रोमो बघून घ्या !!

मंडळी, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व ‘पु.ल. देशपांडे’ यांच्या कथानकांवर आधारित एक नवीन मालिका येऊ घातली आहे. ही मालिका मराठीत नसून चक्क हिंदीत पहायला मिळणार आहे. मालिका म्हटलं की तोच तो रटाळ, चोथा झालेला ‘सास-बहु’वाला फॉर्म्युला आठवतो, पण पुलंच्या साहित्यावर आधारित मालिका म्हणजे त्यात मनोरंजन आणि नाविन्य दोन्ही पाहायला मिळतील.

ही मालिका सब टीव्हीवर पाहायला मिळणार असून मालिकेचं नाव असेल ‘नमुने’. पुलंच्या साहित्यातील एक एक निवडक ‘नमुने’ या मालिकेत दिसतील. याचा एक लहानसा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला.

प्रोमो मध्ये बरेच मराठी चेहरे दिसत आहेत. पुलंच्या रुपात ‘संजय मोने’ तर ‘नामू परीट’च्या भूमिकेत ‘नागेश भोसले. ‘नाथा कामत’च्या रुपात तर खुद्द ‘सुबोध भावे’ दिसत आहे. याबरोबरच हिंदी कलाकारांची यात भर आहे.

मंडळी, सब टीव्हीवर असाच प्रयोग आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांवर झाला होता. पण तो प्रयोग जवळजवळ फसला होता. ‘नमुने’च्या बाबतीत असं होणार नाही हे प्रोमो वरून दिसतंय.

चला तर मग तयार व्हा २१ जुलै पासून शनिवार आणि रविवार पुलंच्या दुनियेत जायला.

सबस्क्राईब करा

* indicates required