भाग १ : अखेर देशद्रोही रबिंदरसिंगला नियतीने धडा कसा शिकवला ??...एका फितूर RAW एजंटची कहाणी !!

रबिंदरसिंग हे नाव आपल्या परिचयाचे असण्याची शक्यता फारच कमी आहे आहे कारण या डबलढोलकी गुप्तहेराचे प्रकरण फारच गोपनीय स्वरुपाचे होते. भारताच्या RAW या गुप्तचर संस्थेला फसवून अमेरीकेत पोबारा केलेल्या RAW च्या अधिकार्याची कथा म्हणजे नैतीक अधःपतनाचा एक नमुना होता. कोण होता हा रबिंदर सिंग ? काय दगलबाजी त्यानी केली ? कसा पळून गेला तो देशाबाहेर ? आणि सरतेशेवटी कसा नियतीने त्याला धडा शिकवला हे आज आपण वाचणार आहोत
कोण होता रबिंदर सिंग ?
१९८० साली मेजर रबिंदर सिंगची नियुक्ति (हो, तेव्हा भारतीय लष्करात तो मेजर होता) RAW मध्ये डेप्युटेशनवर झाली. आपल्या कामाच्या जोरावर तो बढतीच्या शिड्या चढत वर वर जात राहीला आणि विविध देशात भारतीय आंतरराष्ट्रीय गुप्तहेर म्हणून काम करत होता. हेग किंवा दमास्कस यापैकी एका ठिकणी काम करत असताना सीआयएने हेरले आणि तो डबलढोलकी म्हणजे डबल एजंट झाला.
पण हे झालं तरी कसं ?
हनी आणि मनी हे दोन प्रकार अगदी सच्चा देशभक्ताला पण कधी कधी लाचार बनवतात, हनी ट्रॅप म्हणजे लैंगीक सुखासाठी एखाद्या महीलेच्या मायापाशात अडकणं किंवा अडकवलं जाणं आणि मनी म्हणजे पैशाची लालूच !!! रबिंदरला दोन्ही प्रकारांनी वश करण्यात आले असावे असा अंदाज आहे. कारण त्याने पलायन करण्यापूर्वी अमाप संपत्ती गोळा केली होती हे RAW ने शोधून काढले.
त्याने काय दगलबाजी केली ?
एकदा CIA च्या संपर्कात आपल्यावर त्याला CIA ने कसून ट्रेनिंग दिलं. सर्वसाधारणपणे अशा गुप्तहेराला ‘मोल’ असे म्हटले जाते. आणि तो मोल सतत CIA च्या एका अधिकाऱ्याच्या संपर्कात असतो. त्याला ‘Handler’ असे म्हणतात. पण रबिंदरसिंग मात्र त्याच्या कारवाया Handler शिवाय करत होता. याचा अर्थ असा की तो स्वतंत्र गुप्तहेर म्हणूनच CIA साठी काम करत होता. RAW च्या अंतर्गत अनेक अधिकाऱ्यांना सुद्धा त्याने फितवून अतिगोपनीय (Top Secret) फायलींची दुसरी प्रत तयार करायला सुरुवात केली आणि अशा जवळजवळ २०,००० फायली त्याने CIA च्या स्वाधीन केल्या. यासाठी काठमांडू (नेपाळ) येथे त्याच्या अनेक फेऱ्या झाल्या. यासाठी त्याला अमाप पैसा मिळाला. पण प्रश्न असा आहे की......
मंडळी पुढच्या भागात आपण बघूया रबिंदरसिंगच्या देशविरोधी कारवाया कोणाच्या लक्षात कशा आल्या नाहीत ?
आणखी वाचा :
भाग २ : अखेर देशद्रोही रबिंदरसिंगला नियतीने धडा कसा शिकवला ??...एका फितूर RAW एजंटची कहाणी !!
'RAW' बद्दल माहिती असाव्यात अश्या २० गोष्टी !!
या दोन प्रसंगांत पाकिस्तानने भारतासमोर हार मानली...आयएसआय प्रमुखांनी केलं कबूल !!
पाकिस्तानात भारतीय हेर का मारले गेले? मोरारजी देसाईंनी खरंच RAWला धोका दिला होता का??