बापरे !! गुप्तचर विभागाचा एक खबरी चक्क नंतर आपला पंतप्रधान झाला ?

आधी आयबी म्हणजे काय ते जाणून घेऊ. कोणत्याही देशात एक देशांतर्गत गुप्तचर यंत्रणा असते आणि एक देशाबाहेरची माहिती मिळवणारी संस्था असते.  उदाहरणार्थ अमेरिकेत आहेत एफबीआय आणि सीआयए. आपल्याकडे त्या आहेत आयबी आणि रॉ. तर आपली आयबी किंवा इंटेलिजन्स ब्युरो, ही देशांतर्गत सुरक्षेकडे लक्ष देणारी गुप्तचर संस्था आहे. ही संस्था ब्रिटीश राज्याच्या जमान्यात जन्माला आली आहे, पण  तरी इंटेलिजन्स ब्युरोला वेगळे असे अस्तित्व नाही. हा तसा केंद्रीय गृह खात्याचा हा एक भाग आहे किंवा गृहखात्याच्या अंतर्गत  असलेलं हे एक खातं आहे. हे खातं संसदेच्या कायद्यानुसार बनलेलं  - statute म्हटलं जातं त्यात येत नाही.   त्यामुळं इंटेलिजन्स ब्युरो (आता या पुढे आपण फक्त आयबी असा उल्लेख करू या) नक्की काय करतो, त्यांचं कामकाज कसं चालतं, आयबीने आतापर्यंत नक्की कोणत्या कामगिर्‍या फत्ते केल्या याची माहिती कोणलाही कळत नाही. 

या खात्याचा कारभार एका  "ब्लु बुक " नुसार चालतो असं म्हणतात. पण हे ब्लु बुक अनेक वर्षं त्या खात्यात नोकरी केलेल्या लोकांनीसुध्दा बघितलेलं नाही.  कधीतरी या खात्यात काम करणारा एखादा अधिकारी निवृत्त होतो, आणि तो त्याच्या कार्यकाळाबद्दल पुस्तक लिहितो.  मग एकदम खळबळजनक माहिती आपल्यासारख्या सर्वसामान्यांना वाचायला मिळते. असंच एक खळबळजनक पुस्तक नुकतंच आमच्या वाचनात आलं आहे.  या पुस्तकाचं नाव आहे  SIN OF NATIONAL CONSCIENCE आणि लेखक आहेत आर. एन. कुळकर्णी.

स्रोत

हे कुलकर्णी अनेक वर्षं आयबीमध्ये कार्यरत होते. आयबीच्या नियमानुसार नोकरी असताना कोणत्याही प्रकारच्या  नोंदी ठेवण्याची बंदी आहे. त्यामुळं तिथले अधिकारी निवृत्त झाल्यावर त्यांच्या स्मरणशक्तिच्या आधारावर आयबीच्या काम करण्याच्या पध्दतीवर आणि कामगिऱ्यांबद्दल पुस्तकं लिहितात. कुलकर्णीनीसुद्धा असंच आयबीबद्दल आणि इतर अनेक खटकणार्‍या गोष्टींवर  आयबीचा मुखवट्याच्या आतला चेहेरा दाखवणारं हे पुस्तक लिहिलं आहे.  याच पुस्तकाच्या वाचनाच्या दरम्यान आजचा हा विषय आम्हाला सापडला. अर्थातच हा विषय खळबळजनक आहे. पण हे सगळे पुढे वाचण्याआधी या विषयाची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. 

आयबी काय काम करते ?

१. आयबी सिक्युरीटी इंटेलिजन्स करते म्हणजेच  देशाच्या सुरक्षेसंबधी  सर्व गुप्त माहिती गोळा करते. राष्ट्रीय धोरण, राजनैतिक निर्णय, लष्करात होणार्‍या कारवाया यांमध्ये भाग घेऊन गुप्त माहिती गोळा करते. 

२. आयबी काउंटर इंटेलीजन्सही करते.  म्हणजेच, देशात अनेक संशयित गुप्तहेर असतात.  काही दुसऱ्या देशांचे गुप्तहेर असतात तर काही  वेगवेगळ्या देशांतून आलेले राजनैतिक अधिकारी  आपल्या देशात गुप्त कारवाया करत असतात. या अधिकाऱ्यांना बरेचदा आपले इथलेच लोक माहिती पुरवत असतात. हे अधिकारी आणि त्यांच्याशी संपर्क ठेवून असणारे भारतीय नागरीक  या सगळ्यांवर लक्ष ठेवणे हे काउंटर इंटेलीजन्सचे मुख्य काम असते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातल्या एका मंत्री महोदयांची पत्नी नेहेमी रशियन वकीलातील एका अधिकार्‍याच्या संपर्कात असायची. आता, अशा घटनेकडे बारकाईने लक्ष देणे हे आयबीच्या अखत्यारीत येते. आता या मंत्रीणबाईंकडे आपण नंतर बघू.

३. काउंटर इंटेलिजन्स सोबतच काउंटर एस्पिऑनेज ही पण आयबीची जबाबदारी समजली जाते. काउंटर इंटेलीजन्स  आणि एस्पिऑनेज हे दोन वेगळे भाग आहेत. एस्पिऑनेज म्हणजे या ना त्या प्रकारे गुप्त माहिती मिळवणे. सिक्युरीटी इंटेलिजन्स- देशाच्या सुरक्षेसंबधी सर्व गुप्त माहिती गोळा करणे. राष्ट्रीय धोरण, राजनैतिक निर्णय, लष्करात होणार्‍या कारवाया या मध्ये भाग घेऊन गुप्त माहिती गोळा करणे. काउंटर इंटेलीजन्स - देशात अनेक संशयीत गुप्तहेर असतात. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या देशांतून आलेले राजनैतिक अधिकारी जे आपल्या देशात गुप्त कारवाया करत असतात. हे अधिकारी आणि त्यांच्याशी संपर्क ठेवून असणारे भारतीय नागरीक, या सगळ्यांवर लक्ष ठेवणे हे काउंटर इंटेलीजन्सचे मुख्य काम असते. महाराष्ट्रातील एका मंत्री महोदयांची पत्नी नेहेमी रशियन वकीलातील (तेव्हा ते आताचे रशिया नसून USSR होते) एका अधिकार्‍याच्या संपर्कात असायची. आता, अशा घटनेकडे बारकाईने लक्ष देणे हे  आयबीच्या अखत्यारीत येते. आता जे उदाहरण दिले त्याची माहिती आपण नंतर कधी तरी वाचू, तूर्तास इतकेच पुरेसे आहे.

स्रोत

तर,  एस्पिऑनेजमध्ये आयबीचे अधिकारी इतर देशांच्या नागरीकांकडून आणि अधिकार्‍यांकडून माहिती गोळा करत असते. आता ही माहिती गोळा करण्यासाठी वेगवेगळे मार्ग  वापरले जातात. त्यामध्ये राज्याचे पोलीस अधिकारी, इतर खात्याचे सरकारी अधिकारी, राजकारणी पुढारी आणि त्यांचे पित्ते , यांच्याकडून नियमित माहिती गोळा केली जाते.  हे लोक खात्याचा भाग नसतात, पण पैशासाठी असली कामं करत असतात. जे लोक पैशासाठी काम करत नाहीत, ते राजकारणात आपले महत्व वाढावे म्हणून काम करतात. अशा लोकांना "सोर्स" असे म्हटले जाते. थोडक्यात, "सोर्स" म्हणजे सोप्या भाषेत खबरी. हे खबरी गुप्तपणे  आयबीपर्यंत खबरा पोहचवत असतात. त्यांना आयबीकडून पैसे दिले जातात. या पैशाचे एक गुप्त बजेट असते.  त्याला सिक्रेट सर्व्हिस मनी असं म्हटलं जातं. पण असं मानलं जातं की पैशांपेक्षा  हे खबरी बर्‍याचदा राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करता याव्यात म्हणून काम करत असतात. 

आता वळू या एक " खबरी" पंतप्रधान झाला या मुद्द्याकडे!! आमच्याकडे उपलब्ध असलेल्या पुस्तकाच्या १३५ व्या पानावर ही अजब गजब कथा एकाच परिच्छेदात लेखकाने मांडली आहे. मूळ परिच्छेद आम्ही सोबत देतोच आहोत.  पण त्याचा मराठी गोषवारा असा आहे -

" हे गृहस्थ आयबीचे "खबरी " होते. हे खबरी महाशय काही फार मोठे राजकारणी नव्हते. जात्या चलाख पण डरपोक असलेले हे खबरी अत्यंत गोड भाषेत समाजवादाबद्दल बोलायचे आणि आवही तसाच आणायचे. जेव्हा राजकारणाचा प्रश्न आला तेव्हा आयबी आणि हे खबरी यांचे संबंध एकमेकांना पूरक असेच होते.  लालूच , कपट, आणि राजकीय सामर्थ्याने पछाडलेले, या तिन्हींचा वापर गादी तक्क्यासारखा करून राजकारणात अनेकांशी संबंध वाढवले. या सगळ्या प्रकाराला हे गृहस्थ सोयीस्कररित्या राजकीय लवचिकता म्हणायचे. काही वर्षातच हे "खबरी " दक्षिणेतल्या एका राज्याचे मुख्यमंत्री तर झालेच, पण राष्ट्रीय राजकारणाच्या एका विचित्र वळणावर हे "खबरी" पंतप्रधान पण झाले."

लेखक पुढे म्हणातात "When IB Faced with the situation of their sources becoming the political masters the barricades of ethics collapsed as IB was used by them as bell boy."

या संपूर्ण परिच्छेदात या पंतप्रधानांचे नाव आर.एन. कुळकर्णी यांनी दिलेले नाही. ते कोण असतील हे वाचकाच्या कल्पनाशक्तीवर सोडून दिलं आहे. आम्ही पण आमच्या कल्पना ताणून बघतो आहे, तुम्हीही तुमच्या कल्पनाशक्तीला ताण द्या!! जे समजले ते आम्ही किंवा तुम्ही कोणीही कोणाला सांगायचे नाही!!!

फक्त लक्षात घ्या,  प्याद्याचा वजीर फक्त बुध्दीबळातच होतो असे नाही, तर भारतीय राजकारणात पण होतो!!!!!
आर. एन. कुळकर्णींच्या पुस्तकात असे अनेक किस्से आहेत, पण ते नंतर कधीतरी....

सबस्क्राईब करा

* indicates required