हा आहे इतिहासातला सर्वात कंटाळवाणा दिवस...तारीख बघा राव!!

सर्वाधिक पाऊस पडलेला दिवस, वर्षातला सर्वात मोठा/लहान दिवस, सर्वाधिक उच्च तापमान असलेला दिवस, असे खास दिवस अनेकदा मोजले जातात. पण कधी ऐकलं आहे का, वर्षातला सर्वात कंटाळवाणा दिवस सुद्धा मोजला गेलाय ? नसेल तर आम्ही सांगतो ना भाऊ.

स्रोत

‘विल्यम टन्सटल-पेडो’ या शास्त्रज्ञाने एक सॉफ्टवेअर विकसित केलं आहे, ज्याचं नाव आहे ‘True Knowledge’. हा सॉफ्टवेअर सर्च इंजिनसारखा काम करतो. या सर्च इंजिनद्वारे कोणत्या दिवशी इतिहासात कोणती घटना घडली होती याची माहिती मिळते. त्यानुसार ११ एप्रिल, १९५४ हा सर्वात कंटाळवाणा दिवस होता. कसा ?

तर, या सर्च इंजिनप्रमाणे ११ एप्रिल १९५४ च्या दिवशी काहीही विशेष घडलं नव्हतं. कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा त्यादिवशी वाढदिवस नव्हता किंवा पुण्यतिथी नव्हती. एवढंच काय त्या दिवशी काही खास घडलंसुद्धा नाही, जेणेकरून त्या दिवसाची आठवण राहावी. नाही म्हणायला या दिवशी तुर्कस्थानच्या अब्दुल्ला अतालर या शास्त्रज्ञांचा जन्म झाला. एवढंच !!

True Knowledge सॉफ्टवेअर (स्रोत)

राव, विल्यम यांनी गम्मत म्हणून या सर्च इंजिनला ‘सर्वात कंटाळवाणा दिवस कोणता‘ असा सवाल केल्यावर हे उत्तर मिळालं. मग आता प्रश्न पडतो की हा दिवस खास नव्हता म्हणता म्हणता खास झाला की राव.

याखेरीज या सर्च इंजिनने ३० एप्रिल १९३० या दिवसाला सर्वात सुस्त दिवस म्हटलंय. याचं कारण म्हणजे या दिवशी एकही बातमी नव्हती. बीबीसीच्या रेडीओवर न्यूज रिपोर्टरने तर चक्क म्हटलं, “आज कोणतीही बातमी नाही.” आश्चर्य आहे ना राव, हल्ली असं घडणं जवळजवळ अशक्य आहे.  

१९५४ आधी ११ एप्रिल रोजी काय घडलं होतं ?

राव या सर्च इंजिनने ११ एप्रिल १९५४ ला कंटाळवाणा दिवस ठरवलं असलं तरी भारताच्या दृष्टीने हा दिवस महत्वाचा होता. तो असा की याच दिवशी (११ एप्रिल, १९३०) मोतीलाल नेहरू यांनी आपलं घर आनंदभवन देशाला अर्पण केलं होतं. त्यामुळे भारतासाठी तरी या दिवशी काहीच घडलं नव्हतं असं म्हणणं चुकीचं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required