व्हॉटसअँप अपडेट : व्हॉटसअँपवर ग्रुप व्हिडीओ कॉल कसा करायचा ??

मंडळी, व्हॉटसअँपवर आता ग्रुप व्हिडीओ कॉल करता येणार आहे. बऱ्याच दिवसापासून या फिचरची चर्चा सुरु होती. यासंदर्भात काही फेक मेसेजसुद्धा फिरत होते. पण आता शेवटी अधिकृतरीत्या व्हॉट्सॲपने या फिचरची घोषणा केली आहे. अॅन्ड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही मोबाईल्समध्ये हे फिचर असणार आहे.
पण हे फिचर वापरायचं कसं ? चला तर श्टेप-बाय- श्टेप जाणून घेऊया.
१. सर्वात आधी व्हॉट्सॲपचं नवीन व्हर्जन अपडेट करून घ्या!! अॅन्ड्रॉइडवाल्यांनी प्ले स्टोरमध्ये जा आणि iOS वाल्यांनी iOS अॅप स्टोरमध्ये जा.
२. ग्रुप व्हिडीओ कॉल करणं अगदी सोप्पं आहे. आपण जसं नेहमी व्हिडीओ कॉल करतो< तसाच हा कॉल करायचा असतो. फक्त फरक एवढाच की नवीन अपडेटप्रमाणे आणखी एक नवीन ऑप्शन दिला जातो.
३. व्हिडीओ कॉल केल्यावर उजव्या बाजूला ‘add participant’ हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाल. या लिस्टमधून ज्याला कॉल करायचा आहे त्याची निवड करा. निवड झाल्यावर तुमच्या स्क्रीनवर २ व्यक्ती दिसू लागतील. अशाचप्रकारे आणखी एका व्यक्तीला व्हिडीओ कॉलमध्ये समाविष्ट करून घेता येईल.
४. जास्तीतजास्त ३ लोकांसोबत व्हिडीओ कॉल करता येईल. म्हणजे एका स्क्रीनवर ४ जण दिसू शकतात.
५. तुमचे सर्व ग्रुप व्हिडीओ कॉल्स end-to-end encrypted असतील. त्यामुळे तुमचे व्हिडीओ कॉल्स सुरक्षित राहणार आहेत.
६. याच प्रकारे तुम्ही व्हॉट्सॲपच्या iOS व्हर्जनवर व्हिडीओ कॉल करू शकता.
तर मंडळी, भरमसाठ मेसेजेसच्या युगात व्हिडीओ चॅटने बराच डेटा आणि टायपिंग करण्याची मेहनत वाचणार आहे. याबद्दल व्हॉट्सॲपचे आभार मानले पाहिजेत. चला तर, पटापट हे फिचर ट्राय करून बघा !!