बीएमडब्ल्यू अणि ऑडी मध्ये रंगलं ट्विटर युद्ध...कोण जिंकलं बघा !!

पूर्वी लढाई मैदानावर व्हायची पण आता ती सोशल मिडीयावर होते. हे आता सामान्य माणसापर्यंत राहिलेलं नाही. आता हेच बघा ना, कार इंडस्ट्रीतली दोन मोठी नावे – ‘ऑडी’ आणि ‘बीएमडब्ल्यू’ या दोघांमध्ये सोशल मिडीयावर चांगलीच जुंपली. दोन विरोधी कंपन्या जेव्हा सोशल मिडीयावर शाब्दिक युद्ध लढतात तेव्हा काय होतं याचं हे एक चांगलं उदाहरण म्हणता येईल. चला जाणून घेऊया हे भांडण झालं तरी कश्यावरून !!

त्याचं झालं असं की, ‘बीएमडब्ल्यू युसए’ने ट्विटरवर ‘बीएमडब्ल्यू M4’ची जाहिरात केली होती. या जाहिरातीत M4 कार आणि त्यामागे ठिणग्या दिसत आहेत. कळत किंवा नकळत म्हणा पण M4 कारच्या मागे ठिणग्यांचा आकार हा ऑडीच्या लोगो सारखा तयार झाला होता.

हे जेव्हा ऑडीच्या ध्यानात आलं तेव्हा त्यांनी ‘बीएमडब्ल्यू’ला इशारा देत म्हटलं - ‘When you see it...’. म्हणजे ‘जेव्हा तुम्ही ते बघता’. अर्थातच त्यांना लोगोकडे ध्यान आकर्षित करायचं होतं.

तर, ऑडीने सुरुवात केलीच आहे तर बीएमडब्ल्यू तरी कशी गप्प बसणार. यावेळी बीएमडब्ल्यू काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तर त्यांनी एक सडेतोड उत्तर दिलंच. त्यांनी म्हटलं – ‘We see it, where we usually do... in the rear view mirror.’

म्हणजे, ‘आम्ही त्याला तिथेच बघत आहोत जिथे नेहमी बघतो. रियर व्ह्यू मिरर मध्ये.’

तुम्ही स्पर्धेत आमच्या मागेच आहात असा इशाराच बीएमडब्ल्यूने दिला. बीएमडब्ल्यूचं हे उत्तर बघून ऑडीचं तोंड बंद झालं. स्वतःच्याच ट्विटमुळे ऑडी तोंडावर पडली ना राव.

‘बीएमडब्ल्यू’ आणि ऑडी यांच्यात स्पर्धेसाठी होणाऱ्या चकमकी तशा जुन्या आहेत. त्यांनी पोस्टर बाजी करून एकमेकांवर कुरघोडी केली होती. याचे काही नमुने तुम्ही खाली पाहू शकता.

स्रोत

स्रोत

तर, मंडळी आता आम्हाला सांगा. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात ‘बीएमडब्ल्यू’ की ऑडी ?

सबस्क्राईब करा

* indicates required