आयला !! बँका चक्क ६ दिवस बंद राहणार ? पाहा बरं हा मेसेज किती खरा, किती खोटा ?

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँक ६ दिवस बंद राहतील असा मेसेज तुम्हाला आला का ? या मेसेज मध्ये लिहिलंय की २ ते ५ सप्टेंबर आणि ८ व ९ सप्टेंबर रोजी बँका बंद राहतील. म्हणजे एकूण सहा दिवस !! या मेसेजमुळे बँकेची कामं पटापट आवरण्यासाठी तुमची धावपळ होत आहे का ? मग एका जागी शांत बसा, आणि टेन्शन घेऊ नका कारण हा मेसेज खोटा असून बँक ६ दिवस बंद राहणार नाहीय.
आधी हा मेसेज काय आहे ते बघून घेऊ...
या मेसेज मधून असा समज पसरतोय की ३ सप्टेंबर नंतर बँका संप पुकारणार आहेत. यावर अर्थमंत्रालयाने हे स्पष्ट केलंय की बँका फक्त रविवारी (२ सप्टेंबर रोजी) बंद राहतील. त्यांनतर ८ तारखेला दुसरा शनिवार असल्याने बंद राहतील.
राव, खरं तर या मेसेज मध्ये दिलेली संपाची माहिती बरोबर आहे, पण हा संप रिझर्व बँकेचे कर्मचारी करणार आहेत. त्यामुळे असा गैरसमज करून घेण्यात आला आहे की सर्वच बँका बंद राहतील. रिझर्व बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा बँकेच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही.
तुम्हाला प्रश्न पडला असेलच की दहीहंडीचं काय ? तर त्याचं असं की, ३ तारखेला देशातील सर्वच राज्यात सुट्टी नसेल. Negotiable Instruments Act प्रमाणे काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील. विशेषतः मुंबई आणि दिल्ली मधल्या बँकांना दहीहंडीची सुट्टी नसेल.
राहता राहिला प्रश्न ATM बंद राहण्याचा तर नो टेन्शन राव. ही बातमी सुद्धा खोटी आहे. आठवडाभर सर्व ATM’s चालू राहणार आहेत आणि ऑनलाईन व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही. हुश्श.....
तर मंडळी, अशा बातम्या आल्या तर फॉरवर्ड करण्याआधी लगेच पडताळून पाहा. आणि हो हा लेख फॉरवर्ड शेअर करायला विसरू नका !!