गाढवाला शांत करण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली नामी शक्कल !!

राव, मुलाला सुधरवण्यासाठी आईवडील एकच आयडिया करतात. त्याचं लग्न लावून देतात. हेच म्हैसूरच्या गाढवासोबत झालंय. म्हैसूरचा गाढव चवताळून गावभर लोकांना मारत सुटला होता. मग काय, गावकऱ्यांनी मिळून त्याचं लग्न लावून दिलं.

झालं असं की, हे गाढव त्याच्या बायको/पार्टनर सोबत सुखाने नांदत होतं. पण चित्त्याच्या हल्ल्यामुळे गाढवीण मेली. आणि गाढव पडलं एकटं. मग गाढव सैरभैर होऊन गावकऱ्यांना मारत सुटलं.  अनेकजण जखमी झाले. गावकऱ्यांना ‘काय करायचं’ असा प्रश्न पडला.

स्रोत

मग गावकऱ्यांनी तेच केलं, जे प्रत्येक घरात होतं. त्यांनी गाढवाचं दुसरं लग्न करायचं ठरवलं. नवीन गाढवीणीचा शोध सुरु झाला. गावकऱ्यांनी तर गावच्या प्रत्येक घरातून वर्गणी जमा केली. तब्बल २०,००० रुपये जमा झाले. ऑगस्टमध्ये शेजारच्या जिल्ह्यात त्यांना अगदी योग्य वधू सापडली. गावकरी जेव्हा गाढवीण विकत घ्यायला गेले तेव्हा त्यांनी गावच्या गाढवाची कथा मालकाला सांगितली. आणि काय आश्चर्य गाढवाची गाढवकथा ऐकून मालक विरघळला. त्याने फ्रीमध्ये गाढवीण देऊ केली राव !!

मग काय वऱ्हाडी झाले हुरा गावचे गावकरी. गाढवीणीवर एक रुपयाही खर्च झाला नव्हता.  मग गावकऱ्यांनी सगळा पैसा खर्च केला मंडप, पेढे आणि पंडितांवर. माणसाचं होतं तसं सात फेरे घेऊन लग्न पार पडलं राव.

स्रोत

गाढव असो वा मानव, प्रत्येकाच्या समस्येवर भारतात एकच उपाय. लग्न !!! 

तुमच्या कोणत्या मित्राचं लवकरच लग्न होणार असेल तर त्याला टॅग करा राव !!

सबस्क्राईब करा

* indicates required