खुन्या मारुती, भिकारदास मारुती किंवा गुंडाचा गणपती...पुण्यातली ही १५ विचित्र नावाची देवळं पाहिलीत का?
नावं ठेवावीत ती पुणेकरांनीच. एरव्हीही पुणेकर अनेकांना नावं ठेवतच असतात. पण निदान देवाला तरी सोडायचं की नाही? पुणेकरांनी देवांनाही अशीच अतरंगी नावं ठेवलेली आहेत. खुन्या मारुती, डुल्या मारुती, भिकारदास मारुती किंवा हाईट म्हणजे गुंडाचा गणपती जो खरोखर गुंडांनी बसवला असं म्हणतात. अशी नावं कुठे सापडतील? अर्थातच पुणे !!
पिनकोड पद्धत सुरु होण्यापूर्वी पुण्यात ठिकाणांची नावे अमुक अमुक देवळाच्या बाजूला किंवा तमुक देवळासमोर अशा स्वरुपाची असायची. कालांतराने पिनकोड पद्धत आली आणि पारंपारिक पद्धत गेली. त्यामुळे या मंदिरांचं महत्व कमी झालं. आजच्या काळात पुण्यातली ही मंदिरं एक ऐतिहासिक वारसा घेऊन उभी आहेत. नावं विचित्र असली तरी त्यांच्यामागे मोठा इतिहास लपला आहे. तो वारसा जपण्याची आज गरज आहे.
राव, पुणेरी पाट्या तर खूप बघितल्या. आज पाहूयात पुण्यातली विचित्र नावं असलेली १५ देवळं..
१. उपाशी विठोबा
पत्ता : १२६४, वसंतराव लिमये रोड, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र - ४११०३०
२. पत्र्या मारुती
पत्ता : लोखंडे तालीम रोड, भटांचा बोळ, नारायण पेठ, पुणे, महाराष्ट्र - ४११०३०
४. जिलब्या मारुती
पत्ता : शनीपार मंडई रोड, तुळशीबाग, शुक्रवार पेठ, पुणे, महाराष्ट्र - ४११००२
५. डुल्या मारुती
पत्ता : २६०, लक्ष्मी रोड, राजेवाडी, नवीन नाना पेठ, गणेश पेठ, पुणे, महाराष्ट्र - ४११००२
६. भिकारदास मारुती
पत्ता : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रोड, नातू बाग, सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र ४११००२
७. खुन्या मुरलीधर
पत्ता : क्रांतिवीर वासुदेव फडके पथ, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र - ४११०३०
८. गुंडाचा गणपती
पत्ता : ६४९, लक्ष्मी आरडी, कसबा पेठ, पुणे, महाराष्ट्र - ४११०११
९. निवडुंगा विठोबा
पत्ता : ५१२, विठ्ठलराव कांगले रोड, अनुतेज सिम्फनी सोसायटी, नवीन नाना पेठ, गणेश पेठ, पुणे, महाराष्ट्र - ४११००२
१०. भांग्या मारुती
पत्ता : साठे टॉवर्स, छत्रपती शिवाजी महाराज रोड, रामेश्वर चौक, शनिवार पेठ, पुणे, महाराष्ट्र - ४११००२
१२. अकरा मारुती
पत्ता : २४५, बापूसाहेब परांजपे रोड, शुक्रवार पेठ, पुणे महाराष्ट्र - ४११००२
१४. दाढीवाला दत्त
पत्ता : ४७६, शशिकांत गोडबोले रोड, भटांचा बोळ, नारायण पेठ, पुणे, महाराष्ट्र - ४११०३०
१५. पिवळी जोगेश्वरी
पत्ता : ९०३, अण्णासाहेब खैरे पथ, शुक्रवार पेठ, पुणे महाराष्ट्र ४११००२
यातली बरीच मंदिरं एकमेकांपासून अगदी पावलांच्या अंतरांवर आहेत. पुण्याला जाल तेव्हा या मंदिरांना भेट द्यायला विसरू नका बरं.




