त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय बदलला, पण तोपर्यंत उशीर झाला होता....वाचा पुढे काय झालं !!

मंडळी, मुंबईत काल एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्यासाठी त्याने शोले टाईप आयडिया काढली. तो एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावर गेला व तिथून क्रेनच्या टोकावर गेला. तिथून त्याने उडी मारली. मग अचानक त्याचं मत परिवर्तन झालं आणि त्याने हा निर्णय रद्द केला. पण तो पर्यंत उशीर झाला होता राव....पुढे काय झालं त्याबद्दल आम्ही सांगूच, पण त्याआधी वाचूया याची बॅकग्राउंड स्टोरी.
हा तरुण झारखंडचा आहे. सध्या तो अंधेरीतल्या सहारा रोडवरच्या एका इमारत बांधणीच्या ठिकाणी काम करतो. त्याच्यावर त्याच्याच एका सहकाऱ्याने चोरीचा आळ घेतला होता. त्यामुळे नैराश्यातून त्यानं आत्महत्येचा निर्णय घेतला.
दसऱ्याच्या निमित्ताने सगळ्यांना दुपारीच सुट्टी देण्यात आली होती. सगळे निघून गेले तरी तो पुन्हा इमारतीत आला आणि इमारतीच्या १४ व्या मजल्यावर असलेल्या क्रेनच्या टोकावर जाऊन उभा राहिला. तो तिथूनच आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला. खाली उभे असलेले लोक त्याला मागे फिरण्यासाठी विनवणी करत होते.
तब्बल ४५ मिनिटाने या ड्रामाचा क्लायमॅक्स आला. शेवटच्या एका सेकंदात त्याने निर्णय मागे घेतला. पण तोपर्यंत त्याने उडी टाकली होती. खाली पडता पडता त्याने क्रेन हाताने पकडून ठेवली. त्याच अवस्थेत तो बराच वेळ लटकून राहिला. सुदैवाने पाचच मिनिटात तो पुन्हा वर येण्यात यशस्वी झाला. हे सगळं याची देही याची डोळा पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला राव.
तो आता सुरक्षित आहे. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. आता त्याची रवानगी पोलिसांकडे झाली आहे. त्याची कसून चौकशी होत आहे.