२६/११ च्या हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास मिळणार तब्बल एवढे रुपये बक्षीस !!

आज २६/११ च्या हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने अमेरिकेने एक मोठी घोषणा केली आहे. मुंबई वरील हल्ल्यातील मुख्य आरोपींची माहिती देणाऱ्यास तब्बल ५ मिलियन डॉलर्सचं म्हणजे जवळजवळ ३५ कोटींचं बक्षीस देण्यात येणार आहे.

२६/११ च्या हल्ल्यात सामील असलेल्या कोणत्याही गुन्हेगाराची माहिती देणाऱ्यास अमेरिकन सरकार तर्फे हे बक्षीस देण्यात येईल. आपल्याला माहित आहेच की १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्यातील एकाला म्हणजे अजमल आमीर कसाबला जिवंत पकडण्यात आलं. पण ह्या हल्ल्यातील सगळेच दहशतवादी आज मारले गेलेले नाहीत. यामागचे सूत्रधार, त्यांना मदत करणारे आणि इतर दहशतवादी आजही खुलेआम फिरत आहेत. या सारख्या दहशतवाद्यांना पकडल्याशिवाय २६/११ च्या हल्ल्याला न्याय देता येणार नाही.

स्रोत

मंडळी, हे बक्षीस अमेरिकेच्या ’रिवॉर्ड्स फॉर जस्टिस प्रोग्रॅम’ने जाहीर केलं आहे. बक्षीस जाहीर करताना त्यांनी म्हटलं की ‘२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषींना पकडण्यासाठी अमेरिका नेहमीच कटिबद्ध राहील.’

मंडळी, २६/११ च्या हल्ल्याच्या संदर्भातील हे तिसरं बक्षीस आहे. अशाच प्रकारचं बक्षीस हे २०१२ साली लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईदची माहिती देणाऱ्यासाठी जाहीर केलं होतं.

सबस्क्राईब करा

* indicates required