एका महिन्यात बारा सुट्ट्या. बँका करणार लाखाचे बारा हजार !!

एका महिन्यात बारा सुट्ट्या. एका महिन्यात बँका करणार लाखाचे बारा हजार!!


ही अतिशयोक्ती नाही. येत्या जुलै महिन्यात बँका चक्क बारा दिवस बंद असणार आहेत. जुलै महिना हा खर्चाचा महिना. शाळा सुरु झाल्या आहेत. पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यामुळे डॉक्टरकडल्या फेर्‍या वाढणार आहेत. झालंच तर, या महिन्याच्या अखेरीस "गटारी" महोत्सव पण आहेच. आता काहीजण म्हणत आहेत अकराच सुट्या आहेत. मग बारावी सुट्टी कदाचित रघुराम राजन परत गेल्याच्या आनंदात जाहीर केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीपण हुश्शार रहा. पुरेशी रोकड हाताशी ठेवा. अशा वेळी नेमक्या घराजवळच्या एटीएममध्ये कॅशचा खडखडाट होतो. या तारखा आहेत  २,३,६,१०,१२,१३,१७,२३,२४,२८,२९,३१.

ताजा कलम : बँकांचा या सुट्ट्यांमुळे होणार्‍या नुकसानीचा हिशोब  बघा. स्टेट बँकेचे गेल्या वर्षी उत्पन्न होते १७४९७२.९७ कोटी रुपये. या आधाराने बारा दिवसांचे अंदाजे नुकसान होते ५७५२ कोटी रुपये. ऐपतीनुसार प्रत्येक बँक असेच नुकसान करणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required