व्हिडीओ ऑफ दि डे : त्सुनामीने संपूर्ण बँड गिळला...पाहा हा व्हिडीओ !!

मंडळी, शनिवारी इंडोनेशिया मध्ये त्सुनामी येऊन धडकली. नेमक्या याच वेळी समुद्रकिनाऱ्यावर एका पॉप बँडचा कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रमातील कोणालाही माहित नव्हतं की थोड्याचवेळात तिथे काय घडणार आहे. कार्यक्रम ऐनभरात असताना त्सुनामीच्या एका मोठ्या लाटेने संपूर्ण कार्यक्रम उध्वस्त केला. हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सूचना : हा विडिओ बघून तुमच्या मनात अस्वस्थता आणि विषाद निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या जबाबदारीवर बघा !

त्सुनामीच्या धडकेत बँडचा मॅनेजर आणि एका वादकाचा मृत्यू झाला आहे. व्हिडीओत दिसणारा मुख्य गायक सुदैवाने बचावला, पण त्याची पत्नी आणि इतर ३ लोक सापडलेले नाहीत. कार्यक्रमात हजर असलेले लोकही जखमी झाले आहेत

हा लेख लिहिताना मिळालेल्या माहितीनुसार त्सुनामीमुळे जवळजवळ ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे हरवलेल्यांचा आणि जखमींचा आकडा याहून कमी नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required