अवघा ७ वर्षाचा लहानगा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन कसा झाला ? हे आहे त्याचं कारण !!

काल भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना जिंकला. या सामन्यानंतर एक अजब गोष्ट पाहायला मिळाली. co-captain म्हणून चक्क एका ७ वर्षाच्या मुलाने टीम इंडियाशी हस्तांदोलन केलं. या ७ वर्षाच्या मुलाचं नावही अधिकृतरीत्या ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार म्हणून लिहिण्यात आलं होतं. कोण होता हा मुलगा ? चला जाणून घेऊ !!

या लहानग्याचं नाव आहे आर्की स्कीलर. तो सध्या हृदयरोगावर उपचार घेतोय. तो अवघ्या ३ महिन्याचा असतानाच त्याच्या हृदयरोगाबद्दल समजलं होतं. तेव्हापासून आजतागायत त्याच्यावर १३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पण एवढ्या अडचणी असतानाही त्याचं क्रिकेटवरचं प्रेम काही कमी झालं नाही. त्याच्यात तर आपल्या विराट कोहलीलाही सहज मागे टाकण्याचा आत्मविश्वास आहे.

स्रोत

आर्कीचं स्वप्न ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन बनण्याचं होतं. हे स्वप्न त्याच्या हृदयरोगामुळे अशक्य वाटत असतानाच त्याच्या वाढदिवसानिमित्त ऑस्ट्रेलियन टीमने त्याला मोठा धक्का दिला. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या वेळी त्याला co-captain पदवी देण्यात आली. अशा प्रकारे त्याचं आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालं.

काही आठवड्यापूर्वी आर्की त्याच्या टीम सोबत मैदानावर ट्रेनिंग घेताना दिसला होता. सामन्याच्या ५ दिवसांमध्ये तो मैदानावरच बसून होता. ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर त्याने टीम इंडियाशी हस्तांदोलनही केलं.

स्रोत

मंडळी, आर्की स्कीलर हा फक्त शारीरिक क्षमतेच्या बाबतीत कमकुवत आहे, पण त्याचा आत्मविश्वास हा मोठ्यांनाही लाजवेल इतका कणखर आहे. त्याच्या टीमने सामना हरला असला तरी त्याने मात्र सगळ्यांची मने जिंकली आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required