पासवर्ड हरवल्याने लोकांचे १००० कोटी अडकले !!! वाचा हा आगळावेगळा किस्सा
मंडळी, इम्रान हाश्मीचा घनचक्कर बघितला आहे का तुम्ही ? नसेल बघितला तर कथा थोडक्यात सांगतो. एका चोराने चोरीची भलीमोठी रक्कम लपवून ठेवलेली असते, पण काही वर्षाने तो पैसे कुठे ठेवले आहेत हेच विसरून जातो.
आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे नुकतीच अशीच काहीशी घटना घडला आहे. ही काही चोरीची केस नाही, पण परिस्थिती सिनेमाला शोभेल अशीच आहे. त्याचं झालं असं की QuadrigaCX या क्रीप्टोकरन्सी ट्रेडिंग कंपनीचा मालक गेराल्ड कॉटन याचा नुकताच मृत्यू झाला. तो जयपूर मध्ये अनाथाश्रम बांधण्यासाठी आला होता. पण हे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठलं.
आता गोची अशी झाली आहे की त्याच्या कंपनीने जे पैसे गुंतवले होते त्या अकाऊंटचं पासवर्ड फक्त गेराल्डलाच माहित होतं. आता तो या जगात नसल्याने अकाऊंट लॉक झालं आहे. या अकाऊंट मध्ये लोकांचे तब्बल १००० कोटी पर्यंतचे पैसे अडकले आहेत. गेराल्डच्या कंपनीने हे सगळे पैसे बिटकॉइन, लिटकॉइन, इशर अशा डिजिटल चलनात गुंतवले होते.
मंडळी, गेराल्डने हा पासवर्ड कोणालाच सांगितलेला नाही किंवा तो लिहूनही ठेवलेला नाही. एवढंच काय त्याच्या पत्नीलाही पासवर्ड बद्दल काहीच माहित नाही. अनेक एक्स्पर्ट्सनी हा पासवर्ड क्रॅक करण्याचा प्रायत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही.
या सगळ्यात गुंतवणूकदारांना भोवळ येण्याची वेळ आली आहे. ही पहिलीच वेळ आहे जिथे पैसे तर आहेत पण त्यांना हात लावता येत नाहीये. आता हे सगळं प्रकार गेलंय कोर्टात. कोर्ट यावर काय म्हणतंय हे पाहण्यासारखं असेल.
यावर नेटकाऱ्यांनी आपल्या संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक गेराल्डला श्रद्धांजली देत आहेत तर काही लोक या सगळ्या प्रकाराला मोठा ‘झोल’ म्हणतायत. तुम्हाला काय वाटतं ? सांगा बरं !!




