पाकिस्तानवर एअरस्ट्राईक, १०००किलोचा बॉम्ब म्हणजे काय, नक्की काय उध्वस्त झालंय जाणून घ्या आपल्या मायबोलीत!!
“ये नया हिंदुस्तान है! ये घर मे घुसेगा भी और मारेगा भी!”
उरी सिनेमातला हा डायलॉग आठवतोय का. या डायलॉगला भारतीय वायू दलाने सत्यात उतरवलं आहे. पुलवामाच्या भ्याड हल्ल्यानंतर ज्या सर्जिकल स्ट्राईकची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती अखेर आज झालीच. भारतीय वायू दलाने अत्यंत हुशारीने आणि नियोजनबद्धतेने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना यमसदनी धाडलंय.
यावेळी उरी सिनेमातला आणखी एक डायलॉग आठवतो.
“हाऊ इज द जोश?”
“हाय सर!”
चला तर या संपूर्ण कारवाईबद्दल सविस्तर जाणून घेऊया !!
पहाटे ३.३० ची वेळ. पुन्हा एकदा उरी सर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती होणार होती, पण यावेळी हवाई मार्गाने. हा भारताचा पहिलाच एअर-स्ट्राइक असणार होता. यानिमित्ताने १९७१ नंतर पहिल्यांदाच भारतीय वायू दलाचे जेट्स पाकिस्तानच्या आतल्या भागात धुडगूस घालणार होते.
कारवाईत नेमकं काय घडलं ?
भारताच्या एकूण १० ‘मिराज २०००’ या विमानांनी १००० किलोग्रामचे बॉम्ब्स मुजफ्फराबाद, बालाकोट, आणि चाकोठी भागातल्या दहशतवाद्यांच्या तळावर टाकले आहेत. हा भाग जैश- ए- मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचं घर आहे. अवघ्या २१ मिनिटांच्या कारवाईत भारताने दहशतवाद्यांना दणदणीत तडाखा दिला आहे.
प्राथमिक माहितीनुसार या एअर-स्ट्राइक मध्ये तब्बल २०० ते ३०० दहशतवादी ठार झाले आहेत. हे तर काहीच नाही राव, महत्वाचं म्हणजे १४ तारखेच्या हल्ल्याला जबाबदार जैश- ए- मोहम्मदचं अल्फा – ३ हे कंट्रोल रूम या हल्ल्यात उध्वस्त झालं आहे.
एअर-स्ट्राइकच्या महत्वाचा टार्गेट्सपैकी बालाकोटबद्दल बोलायचं झालं तर हा भाग लाईन ऑफ कंट्रोल पासून फारच आतला भाग आहे. एवढ्या आतवर जाऊन कारवाई करण्याची ही भारताची पहिलीच वेळ. मंडळी, याच बालाकोटच्या अगदी ६२ किलोमीटरवर अॅबोटाबाद आहे. यावरून काही आठवलं का ? याच ठिकाणी तर ओसामा बिन लादेन सापडला होता.
आता या हल्ल्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी समजून घेऊ.
१००० किलोचा बॉम्ब म्हणजे काय? हा 1000 किलोचा एकच बॉम्ब आहे की 100 किलोचे दहा? नेमकी ही संज्ञा काय आहे हे आपण जाणून घेऊया…
आपण TNT हा शब्द पूर्वी ऐकला असेलच. TNT म्हणजे Trinitrotoluene. हे एका विस्फोटक पदार्थाचे नाव आहे जे बॉम्ब मध्ये वापरले जाते. याला शास्त्रीय भाषेत 2-methyl-1,3,5-trinitrobenzene असेही म्हटले जाते.
कुठल्याही स्फोटात किती एनर्जी बाहेर पडली हे मोजण्याचे एकक म्हणून TNT equivalent या शब्दाचा वापर केला जातो.
म्हणजेच एखाद्या स्फोटात किती टन ऊर्जा बाहेर पडली ते मोजण्याचे हे माप आहे असे म्हणायला हरकत नाही.
आता बघूया 1000 किलोचा बॉम्ब म्हणजे नेमके काय ?
तर, मंडळी एक टन टीएनटीच्या स्फोटात अंदाजे ४.१८४ गिगाज्यूल्स इतकी ऊर्जा फेकली जाते. म्हणजेच एक ग्रॅम टीएनटीच्या स्फोटात ४.१८४ ज्यूल्स म्हणजेच १००० कॅलरी ज्याला ‘एक लार्ज कॅलरी’ असेही म्हटले जाते, इतकी ऊर्जा बाहेर पडते.
आता हा आजचा बॉम्ब होता १००० किलोटनचा. याचा अर्थ असा की, या बॉम्ब मध्ये ४.१८४ टेराज्यूल्स इतका विध्वंस करण्याची ताकद आहे. काही बॉम्ब मेगाटनचे सुद्धा असतात बरं का. १००० मेगाटन च्या बॉम्बमध्ये ४.१८४ पेटाज्यूल्स इतकी ऊर्जा बाहेर फेकण्याची शक्ती असते.
तर मंडळी एकूण काय तर हजार किलोचा बॉम्ब याचा अर्थ त्याचे वजन हजार किलो असे नसून त्याची विनाश करण्याची क्षमता किती आहे असा होतो. ही क्षमता वरती सांगितल्याप्रमाणे ४.१८४ टेराज्यूल्स इतकी आहे!
मंडळी ही माहिती थोडी क्लिष्ट आणि समजण्यास अवघड वाटत असली तरी आपल्या सैन्याची ताकद किती आहे याचा अंदाज लावण्यासाठी माहीत असणे गरजेचेच आहे
(प्रातिनिधिक फोटो)
बरं चला, काही उदाहरणांच्या माध्यमातुन याला आणखी सोपं करू…
एक हजार कॅलरी म्हणजेच एक लार्ज कॅलरी ही एक किलोग्राम पाण्याचे तापमान एका डिग्रीने वाढवू शकते. फक्त एक किलोग्राम टीएनटी एका वाहनाला सहज उडवू शकते. इथे तर 1000 किलोटन बॉम्ब वापरला गेलाय! म्हणजे त्याची ताकद किती असेल याचा अंदाज येऊ शकेल.
तर मंडळी, आज भारताने केलेल्या या महत्वाच्या कारवाईने आपण छाती ठोकून, गर्वाने म्हणू शकतो.
“ये नया हिंदुस्तान है! ये घर मे घुसेगा भी और मारेगा भी!”
कसा वाटला हा लेख ? आपल्या सैन्याप्रमाणेच जोशाने कमेंट्स येउद्या राव !!
लेखक : अनुप कुलकर्णी आणि सिद्धार्थ गायकवाड




