अलिबाग से आया हे क्या?? असे म्हणणे सोडून द्या नाही तर जेल मध्ये जावे लागू शकते.
थांबा, घाबरु नका.. अजून कोर्टाने बंदी घालायची आहे तोवर प्रकरण काय आहे समजून घ्या. मंडळी आजवर आपण अनेक वेळा एखाद्या मठ्ठ कृती वर आपल्या एखाद्या मित्राला 'अलिबाग से आया हे क्या' विचारले असेल. पुणेकरांनी कदाचित खडकी दापोडी वरून आलास का विचारले असेल. तर मंडळी आज काल ऑफेंड होण्याचा जमाना आहे. तर एक सद्गृहस्थ वारंवार होणाऱ्या अलिबाग से आया क्या या अपमान जनक वाक्यावर ऑफेंड झाले आणि त्यांनी चक्क कोर्टाची पायरी चढायचे ठरवले ना राव.
तर हे सद्गृहस्थ म्हणजेच राजेंद्र ठाकूर हे अलिबाग चे रहिवासी आहेत. त्यांनी अलिबागच्या या होणाऱ्या अपमानाला थांबवण्यासाठी मुंबई हाय कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली आहे. येत्या दोन आठवड्यात यावर सुनावणी होईल. ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार असे म्हणणे हे अलिबागच्या लोकांवर अन्यायकारक आणि अपमानजनक आहे कारण अलिबाग चे लोक अशिक्षित असतात असा अर्थ यातून निघतो.
ठाकूर यांना राज्यसरकारने या वाक्य वापरण्यापासून सामान्य नागरिकांना रोखण्यात यावे तसेच चित्रपट मालिका आणि इतर माध्यमात या वाक्याचा वापरावर बंदी घालावी असे वाटते. आता आधी ठाकूर ही केस जिंकतात का ते पाहावे लागेल पण ते जर जिंकले तर आपल्या कोर्टाला अजून अशा अनेक केसेस हाताळाव्या लागतील.
मंडळी तुमचं या प्रकरणावर काय म्हणणे आहे आम्हाला आवश्य कळवा.




