अक्षय कुमारचा येतोय नवीन सिनेमा - रूस्तम...

Subscribe to Bobhata

आजच अक्षय कुमारच्या रुस्तमचा ट्रेलर रिलीज झालाय. पोस्टर्सवरून दिसतं आहे की हा सिनेमा ’कावसजी माणेकशॉ नानावटी’ यांच्या खटल्यावरून प्रेरित आहे. अर्थातच नानवटींची भूमिका अक्षयकुमार करत आहे. १९५९मध्ये हा खून खटला बराच गाजला होता. या खटल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वर्तमानपत्रांनी या खटल्याबद्दल इतकं भरभरून लिहिलं, की तेव्हा न्यायदानासाठी असलेल्या ज्युरींना नानावटी निर्दोष वाटले. त्यामुळे केलेला खून मान्य करूनही नानावटी ज्युरींच्या मते निर्दोष  ठरले. मुंबई हायकोर्टाने ज्युरींचा निर्णय रद्दबातल ठरवत ज्युरी सिस्टीमच बंद केली. काही जुन्या सिनेमांत दिसणारी ’मेंबर्स ऑफ ज्युरीं’ना संबोधित करणारी सिस्टीम तेव्हापासून भारतातून नाहिशी झाली. म्हणजेच मिडिया ट्रायल हा प्रकार तसा भरपूर जुनाच आहे.  या खटल्यावर आजपर्यंत अनेक पुस्तके आणि सिनेमे निघाले आहेत. 

आपल्या पंजाबी राजीव भाटियाने म्हणजेच अक्षयकुमारने आजवर वेगवेगळ्या भूमिका केल्या. पण पारसी हिरोची भूमिका तो ’रुस्तम’या सिनेमात पहिल्यांदाच करत आहे. या सिनेमाचा दिग्दर्शकही  आपला ’बेबी’ वाला नीरज पांडे आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required