computer

बोभाटा बाजार गप्पा : आज भारतीय बाजाराच्या नजरेतून जगातल्या घटनांकडे बघूया...

शेअर बाजारात चांगली बातमी आणि वाईट बातमी असा फरक नसतो. बातमी असणं हेच महत्वाचं असतं. आंतरराष्ट्रीय बाजारात बातम्यांचे पडसाद वेगवेगळ्या पद्धतीने उमटत असतात. या प्रतिसादांचा अर्थ लावणं हे चातुर्याचं काम असतं. म्हणून आज आपल्या म्हणजे भारतीय बाजाराच्या नजरेतून जगातल्या घटनांकडे बघूया.

गेले काही दिवस बाजारातील एफआयआयने सतत खरेदी केली त्यामुळे मार्केट वर वर जात राहिले यासाठी गुंतवणूकदाराने national stock exchange च्या संकेतस्थळावर एफआयआयच्या खरेदी विक्रीकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे.

या सकारात्मक बातमी सोबत नकारात्मक बातमी अशी आहे की ब्रेंट क्रूडचे भाव हळू हळूहळू वाढत आहेत.

आरबीआय क्रेडिट धोरण उद्या जाहीर होईल. रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात 25 बीपीएस कपात करू शकते अशी बाजारपेठ अपेक्षा आहे.

स्कायमेट आज दुपारपर्यंत मान्सूनचा अंदाज वर्तवेल. आपली संपूर्ण अर्थव्यवस्था मान्सून आधारित असते. या अंदाजावरती उद्याचे मार्केट अवलंबून असेल.

म्हणून सेक्टर वॉच मध्ये बँकिंग आणि एनबीएफसी आणि एफएमसीजी या क्षेत्रातील कंपन्यांवर गुंतवणूकदारांने लक्ष केंद्रित करावे.

या क्षेत्रातील अॅक्टिव्ह शेअर्स  - एसबीआय, पीएनबी, बीओबी, कॅनरा बँक, यस बँक, बजाज फायनान्स, मॅरिको

(एसबीआय चार्टस)

ब्रोकर्सचे लक्ष कुठे आहे ?

१. गोल्डमन टॉप पिक - एशियन पेंट्स अँड रिलायन्स.

२. सीएलएसए ने मॅरिको टार्गेट 465,

३. मॅक्वायरी खरेदी मरिको टार्गेट 394,

४. नोमुरा - 20653 पासून 18335 पर्यंत आईशर मोटर टार्गेट कमी केले.

५. सीएलएसए भारती एअरटेल टार्गेट 410

 

महत्वाची बातमी :

रेमंड्स बोर्ड बैठक आज होणार आहे. कंपनीकडून जमीन सौदा संबंधित समस्येची घोषणा करण्याची अपेक्षा

आयपीओ आणि नवीन लिस्टिंग.

आयपीओ अद्ययावत – आरव्हीएनएलला (रेल्वे विकास निगम) त्याच्या आयपीओ वर 48% नकारात्मक प्रतिसाद आहे. मेट्रोपोल्स हेल्थकेअर आयपीओ रु 877 - 880 आज खुले होईल.

इमामीने हिंदुस्तान युनिलिव्हर विरूद्ध खटला जिंकला - इमामीसाठी सकारात्मक.

सबस्क्राईब करा

* indicates required